Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरुणीची मान बिबट्याच्या जबड्यात होती, तिने बिबट्याच्या डोक्यावर कळशीने वार केले, धाडसाची कमाल

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (11:58 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे घडलेल्या एक थरारक घटनेत तरुणीच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला. वृषाली नावाच्या या धाडसी तरुणीची सर्वत्र चर्चा होत आहे. तिने बिबट्याच्या जबड्यातून स्वत:ची मान सोडवून कमाल धाडस दाखवलं.
 
नेमकं काय घडलं?
वृषाली नीळकंठराव ठाकरे करंजखेड येथील रहिवासी आहे. वृषाली फार्मसीची विद्यार्थिनी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सोमवारी वृषाली आईसोबत आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. दरम्यान पिण्याचं पाणी आणण्यासाठी वृषाली एकटीच शेताजवळच्या ओढ्यावर गेली. कळशी भरून पाणी घेऊन परत येत असताना पाठीमागून बिबट्याने अचानक वृषालीवर हल्ला केला.
 
बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे काही कळायच्या आत वृषालीची मान बिबट्याच्या जबड्यात गेली. मात्र बिबट्यासोबत झालेल्या झटापटीतही वृषालीने प्रसंगावधान दाखवत हातातील कळशीने बिबट्याच्या डोक्यावर अनेक वार केले. एका पाठोपाठ दणके डोक्यावर बसल्यानंतर बिबट्या भांबावून गेला आणि काही सेकंदानंतर बिबट्याने माघार घेतली. बिबट्याने वृषालीची मान जबड्यातून सोडली आणि नंतर जंगलाच्या दिशेनं पोबारा केला.
 
या झटापटीत वृषालीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या असून पायाला मोठी दुखापत झाली आहे. ही घटना लक्षात येताच तिला लगेच पुसद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. तरुणीनं धाडस दाखवल्याने तिचा जीव वाचला अशात तिच्या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये लग्न समारंभात लाखोंची चोरी

LIVE: सिंधुदुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी विधान भवनात बैठक

सोलापूर : महिलेने तिच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

चेन्नईमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

'एमपीएससी परीक्षा मराठीतून होतील,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments