Dharma Sangrah

सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करु द्या : नवाब मलिक

Webdunia
शुक्रवार, 14 मे 2021 (07:54 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रसरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
 
कोविन अ‍ॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अ‍ॅप वारंवार डाऊन होत आहे त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहेच शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकारला हे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्रसरकारने ही परवानगी दिली तर या अ‍ॅप आणि इतर माध्यमातून लोकांच्या नोंदी घेऊन लस देण्यात सुलभता येईल. परंतु केंद्रसरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सासूचे निधन

आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

IND vs SL U19: भारत अंडर-19 आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला

नवी मुंबईत बांधले जाणार आफ्रिका सेंटर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

2025 च्या सर्वोत्तम पुरुष आणि महिला फुटबॉलपटूंना फिफा पुरस्कार प्रदान

पुढील लेख
Show comments