Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के, तर 29 टक्के शाळांचा निकाल शून्य

Webdunia
शुक्रवार, 17 जून 2022 (15:25 IST)
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल  जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद झाली. आज दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन (Online result) निकाल पाहता येणार आहे. यंदाचा 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
 
राज्यातील 22 हजार 921शाळामधून 16 लाख 38हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 29 टक्के शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. यंदाही दहावी परीक्षेत कोकण  विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नाशिक  विभागाचा आहे.
 
राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार आहे.
 
राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के
 
कोकण - 99.27 टक्के
पुणे- 96.96 टक्के
कोल्हापूर - 98.50 टक्के
अमरावती - 96.81 टक्के
नागपूर - 97 टक्के
लातूर - 97.27 टक्के
मुंबई - 96.94 टक्के
नाशिक - 95.90 टक्के
औरंगाबाद - 96.33 टक्के

online result -
//www.mahresult.nic.in
//www.hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार

रविवारी मुंबई, ठाणे आणि भिवंडीत 15 टक्के पाणीकपात होणार

ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने व्यंकट दत्ता साईसोबत साखरपुड़ा केला

हॉकी: भारताने जपानवर मात केली, महिला ज्युनियर आशिया कप हॉकीच्या अंतिम फेरीत चीनचा सामना

मुंबईत बेस्ट बसची दुचाकीला धडक,दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments