Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनमाडच्या एफसीआय गोडाऊन मध्ये चोरी

nashik news
Webdunia
गुरूवार, 8 जून 2023 (20:51 IST)
नाशिक :भारतीय खाद्य निगम (एफसीआय)चे भव्य गोडाऊन  मनमाड शहरालगत आहे. विशेष म्हणजे, आशिया खंडातील नंबर दोनचे धान्य साठवणूक गोदाम अशी त्याची ओळख आहे. याच गोडाऊनमधून आता चक्क तांदळाच्या गोण्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे मोठीच खळबळ उडाली आहे.
 
एफसीआय गोडाऊन मधून केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या विविध भागात अन्न धान्य पाठवले जाते. तसेच, अनेक भागातून अन्न धान्य येथे साठवणुकीसाठी आणले जाते. विशेष रेल्वेची जोडणीही या गोदामाला आहे. म्हणजेच रेल्वेद्वारेही येथे धान्य साठवणुकीला येते. किंवा येथून पुरवठ्यासाठी नेले जाते. याच गोडाऊनमधून तांदळाच्या ५५ गोण्या या चोरीला गेल्या आहे. या चोरीप्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा असताना या ठिकाणाहून चोरी कशी झाली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
 
आशिया खंडातील नंबर दोनचा धान्य साठवणूक गोडाऊन म्हणून मनमाडच्या एफसीआयची ओळख आहे. या ठिकाणावरून राज्यातील अनेक भागांमध्ये तांदूळ आणि गहूचा पुरवठा हा ट्रक द्वारे केला जातो. या गोदामात कडक सुरक्षा आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

Pahalgam Terror Attack : महाराष्ट्रात राहणाऱ्या ५५ ​​पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

भीषण स्फोट मध्ये 406 जखमी, अनेकांचा मृत्यू

ठाकरे गटाला निमंत्रण दिल्याने मनसेवर भाजप नाराज, बैठकीला उपस्थित राहण्यास दिला नकार

LIVE: ठाकरे गटाला आमंत्रित केल्याबद्दल मनसेवर भाजप नाराज

पुढील लेख
Show comments