Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून या पक्षातील नगरसेवक,पदाधिकारी यांना पोलिसांच्या नोटीस

Webdunia
बुधवार, 29 जून 2022 (08:15 IST)
राज्यातील कायद्या सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये देखील काही काही शिवसैनिकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे. शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनिक बाळा दराडे आणि दीपक दातिर यांना देखील पोलिसांकडून नोटिस पाठविण्यात आली आहे.
 
राज्यासह नाशिकमध्ये देखील सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्याचे पडसाद उमटले आहेत. अशात शहरात कायदा आणि सुव्यवस्था भंग होऊ नये याची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. सत्तांतर झाल्यास राज्यात शिवसेना भाजप संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून कायद्या सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नोटिसा बजावल्या जात आहे. राज्यात मोठा संघर्ष निर्माण होण्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती असल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ही पाऊलं उचलली जात आहे.
 
एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिंदेंना समर्थन आणि विरोध दोन्ही पाहायला मिळालं. राज्यात शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करून, फोटोला काळं फासून, तर कधी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून बंडखोरांबद्दल असलेला रोष व्यक्त केला. तर याउलट शिंदे समर्थकांनी रस्त्यावर उतरत ‘शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’चा नारा देत, पोस्टरबाजी करत समर्थन दर्शवलं आहे. राज्यातील हे चित्र पाहता शिवसैनिक विरुद्ध शिंदे समर्थक असे दोन गट तयार झाले आहे. त्यातल्या त्यात अप्रत्यक्षरीत्या आपल्याला भाजपाचा पाठिंबा असल्याच वक्तव्य शिंदेंनी केलं होतं.

अशात सत्तांतर झाल्यास राज्यात शिवसेना-भाजप असा संघर्ष तयार होऊन त्याचा धक्का शांतता आणि सुव्यवस्थेला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर राज्यासह नाशकातही पोलिस प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

सरकार रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्नात, महाराष्ट्रात दारू महागणार!

सात्विक-चिरागने यु सिन ओंग-ई यी टियूचा पराभव करून मलेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, 2वर्षात 50 अमृत भारत गाड्या चालवल्या जातील

नाशिकात होणाऱ्या भावी सुनेशी वडिलांनी केले लग्न, रागात मुलगा झाला संन्यासी

पालघरमध्ये दोघांनी बंदुकीच्या धाकावर 45 लाखांचे सोन्याचे दागिने लुटले

पुढील लेख
Show comments