Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भुजबळांसह अजितदादांनाही जीवे मारण्याची धमकी

भुजबळांसह अजितदादांनाही जीवे मारण्याची धमकी
Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2023 (16:15 IST)
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून आरोपीला अटक केली आहे. भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की फक्त छगन भुजबळच नाही तर अनेक बडे नेते रडार वर होते. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी त्यांच्या कार्यालयातील कार्यकर्त्याच्या मोबाईलवर देण्यात आली. धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाड मधून अटक केली आहे. प्रशांत पाटील असे या आरोपीचं नाव असून तो कोल्हापूरच्या चंदगडचा आहे. 

प्रशांत ने मंदधुंद अवस्थेत छगन भुजबळ यांना धमकी दिल्याचं समजलं आहे. त्याची मानसिक स्थिती देखील ठीक नाही. पोलिसांनी प्रकरण नोंदवून त्याला ताब्यात घेतलं असून भुजबळांच्या घरी पोलीस बंदोबस्त  केला आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पक्षी धडकल्यानंतर फेडेक्स विमानाचे आपत्कालीन लँडिंग

मोहन भागवतांना हाच प्रश्न विचारा, आरएसएस प्रमुख हिंदू नाहीत का?संजय राऊतांची एकनाथ शिंदेंना खोचक टीका

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जितेंद्र आव्हाडांनी हातकड्या घालून निषेध करीत आवाज उठवला

हॉलिवूडमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले

भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी हरवून गटात अव्वल स्थान पटकावले

पुढील लेख
Show comments