Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा!

Webdunia
सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (20:39 IST)
औरंगाबाद : मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीपासून विभक्त होऊनही वारंवार होणाऱ्या त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा दारू पाजून गळा व पोटात चाकू खुपसून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेने खळबळ उडाली असून अश्या प्रकाराने दोन्ही कुटुंब हादरले आहेत. विजय संजयकुमार पाटणी (35, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपीने खून केल्यानंतर २२ ऑक्टोबरला एमआयडीसी वाळूजमध्ये जाऊन पती बेपत्ताची तक्रार दिली होती. तब्बल बारा दिवसांनंतर या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
 
असा झाला खुनाचा उलगडा
 
स्वत: आरोपीनेच विजय बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तिचे घर गाठून चौकशी केली. त्यात तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, उत्तर देताना ती अडखळायला लागताच संशय बळावला. त्यानंतर तांत्रिक तपासात तिला प्रियकर असल्याचे स्पष्ट झाले व पोलिसांनी रविवारी सागरला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली.
 
असा घडला घटनाक्रम
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती विजय संजयकुमार पाटणी आणि पत्नी सारिका विजय पाटणी (30, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) या दोघांमध्ये पटत नसल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विजय त्याच्या वृद्ध आईसह आणि सारिका तिच्या आई व भावासह राहू लागले होते. यादरम्यान, सारिकाची फेसबुकवरून सागरशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. याबाबत विजयला कळाले आणि तो सारिका सतत त्रास देऊ लागला. तसेच पुन्हा एकत्र राहण्याचा हट्ट करायला लागला. यादरम्यान तो अनेकदा दारू पिऊन सारिकाच्या घरी जाऊन त्रास देत होता. त्यामुळे या सर्व त्रासाला सारिका कंटाळली होती. 
 
पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या सारिकाने विजयचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यामुळे 18 ऑक्टोबरला सारिकाने विजयला फोन केला आणि सोबत फिरायला जाण्यासाठी गळ घातली. त्यापूर्वीच तिने चाकू आणि डोळ्यात मारायला स्प्रे खरेदी केला होता. फिरायला गेल्यावर आधीपासूनच तयारीत असलेल्या सारिकाने विजयला दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी सोबत दारू पिली. मात्र विजयला सारिकाने जास्तीची दारू पाजली. दरम्यान दोघे नवीन धुळे-सोलापूर हायवेवर वाल्मीजवळील उड्डाणपुलाजवळ पोहचले. ठरल्याप्रमाणे सारिकाने विजयच्या डोळ्यात स्प्रे मारला. तो गांगरला की लगेचच चाकूने सपासप त्याच्या पोटात वार केले.
 
विजय रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. सारिकाने केलेल्या चाकू हल्ल्यात विजय जागेवर कोसळला. त्याला काहीसे बाजूला सारून तिने फेसबुकवर भेटलेल्या प्रियकर सागर मधुकर सावळे (25 रा. शिवाजीनगर) याला फोन लावला आणि त्याला घटनास्थळी बोलावून घेतले. मात्र घाबरलेल्या सागरने तिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास नकार दिला होता. पण त्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, त्याच्या मदतीने सारिकाने विजयाचा मृतदेह स्त्याच्या कडेला असलेल्या गर्द झाडीत फेकून दिला. त्यानंतर तिने पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या तपासात तिनेच आपल्या पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments