Marathi Biodata Maker

तिवरे धरण दुर्घटना: मदत कार्य सुरु, चौकशी होणार

Webdunia
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण अतिवृष्टीमुळे फुटलं आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता झाले असून दुर्घटनेतील 7 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळाली आहे. 
 
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली गेली होती. आता या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असे गिरीश महाजन म्हणाले. 
 
ताज्या माहितीनुसार घटनेतील 7 जणांचा मृतदेह हाती लागला आहे. नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून काठच्या गावकऱ्यांनाही धोक्याचा इशारा दिला गेला आहे. 
 
धरण 2012 साली बांधून पूर्ण झाले. 2.452 दशलक्ष घनमीटर इतकी त्याची पाणी साठवणुकीची क्षमता आहे. तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. या धरणाची दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार निदर्शनास आणून दिले होते. खासदार विनायक राऊत यांनी पाटबंधारे खात्याला धरण दुरूस्तीच्या सूचनाही केल्या. त्या सूचनांमुळे पाटबंधारे खात्याकडून दोन डंपर माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चार दिवसांच्या पावसाने ही डागडुजीही कमकुवत ठरवली. आता या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 
 
धरण फुटल्यानं ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं 24 जण वाहून गेले. धरण परिसरातील 13 घरंदेखील प्रवाहात वाहून गेली. यामुळे मोठी वित्तहानी झाली. सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेला 12 तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट, पुढील तीन दिवस दिलासा नाही

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! बाजार उघडताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहराचे भाव तपासा

निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेला नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात सादर होणार

"माझा भाऊ म्हणून ऐक..." जरांगे पाटलांसमोर भाजप आमदार भावूक; धमकीच्या फोननंतर अंतरवालीत नेमकं काय घडलं?

LIVE: नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments