Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून एकलहरे औष्णिक केंद्राचा कायापालट करा :ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (15:12 IST)
एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे बराचसा परिसर ओसाड आहे. काही ठिकाणी खूप मोठी झाडे आहेत. या परिसराचे 'बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये' रूपांतर करून या भागाचा कायापालट करावा. जेणेकरून भविष्यात चांगले उद्यान तयार होऊन हिंस्त्र श्वापदांची भीती राहणार  नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी केले.
 
नाशिकच्या एकलहरे, औष्णिक विद्युत केंद्र येथे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा व  विद्युत निरीक्षक विभागाची आढावा  काल संध्याकाळी (12 मे, 2022) राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, सरोज अहिरे, महाजनकोचे कार्यकारी संचालक आर. जी. मोराळे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता एन. एम. शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता डी. ए. कुमठेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता  राजेंद्र गायकवाड, विद्युत निरीक्षक बी. के. उगले व तीनही कंपन्यांचे अभियंते व वरिष्ठ अधिकारी  यावेळी उपस्थित होते.
 
ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळता येईल याचा विचार विजेची कामे करताना  करा. तसेच पावसाळ्यापूर्वी थर्मल पावर स्टेशन कार्यान्वित करा. वीज प्रकल्प येथील राखेला मागणी  असून नियमानुसार राखेचे  वितरण करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच एकलहरेतील मंजूर 660 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत लवकरच सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले . यावेळी त्यांनी वीज निर्मिती केंद्राची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments