rashifal-2026

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने वर्षभरात आठ कोटींची ई-दंडवसुली

Webdunia
गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (10:22 IST)
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने गेल्या वर्षभरात सात लाख ३६ हजार वाहनचालकांना ई-चलन पाठवले आहेत. 
 
त्यातून जवळपास आठ कोटी ७८ लाख २६ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली असून उर्वरित १५ कोटी ६५ लाख रुपयांच्या दंडवसुलीसाठी पोलिसांनी आता मोहीम हाती घेतली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे ई-चलन असलेल्या वाहनचालकांना दंड भरण्यासाठी पोलिसांकडून घरपोच नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
 
‘एक राज्य एक चलन’ अशी योजना राज्य सरकारने लागू केली असून त्यानुसार ही योजना गेल्या वर्षीपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना ऑनलाइन दंडपावत्या पाठवण्यात येत आहेत. या योजनेच्या कारवाईमुळे १४ फेब्रुवारी २०१९ ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत ७ लाख ३६ हजार ४१ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले असून या चालकांवर ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. ७ लाख ३६ हजार ४१ पैकी ३ लाख २४ हजार ५५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 
 
आतापर्यंत ८ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या चालकांकडून एकूण १५ कोटी ६५ लाख १२ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असून 
 
त्यासाठी पाच हजारपेक्षा जास्त दंड झालेल्या चालकांना घरपोच नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
महिना   कारवाई  दंडवसुली       शिल्लक दंड
 
२०१९
फेब्रुवारी  १३,०४३ ३०.५६ लाख     ४.५८ लाख
मार्च       ५४,६३० १.१५ कोटी        २९.९९ लाख
एप्रिल      ७३,१०० १.१९ कोटी      १.०९ लाख
मे           ६८,२४५ ९९.७२ लाख        १.२३ कोटी
जून         ६४,६२५ ७९.९५ लाख     १.२१ कोटी
जुलै         ६३,१३५ ७६.१३ लाख     १.५२ कोटी
ऑगस्ट    ६६,७२९ ८१.४२ लाख    १.२३ कोटी
सप्टेंबर    ५२,८३६ ६०.२७ लाख    १.१४ कोटी
नोव्हेंबर   ६१,८५६ ५०.२५ लाख    १.५५ कोटी
डिसेंबर    ६३,८४९ ५५.६१ लाख    १.७७ कोटी
 
२०२०
 
जानेवारी  ७६,०१६ ४७.३२ लाख    २.३५ कोटी
फेब्रुवारी   २९,४५९ ११.९७ लाख    १.०१ कोटी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments