Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फुगा घेताना स्फोट,दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (14:49 IST)
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या शिंदी बुद्रुक इथं बैल पोळ्यानिमित्ताने यात्रा होती. या यात्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याकडील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.
 
या घटनेत दोन वर्षांची भार्गवी उर्फ परी सागर रोही ही आपले आजोबा रवींद्र किसनराव रोही यांच्यासोबत शनिवारी संध्याकाळी गावातीलच यात्रेत गेली होती. उडणारा फुगा बघून भार्गवीने आपल्या आजोबांकडे फुगा घेण्याचा हट्ट धरला. परीला घेऊन आजोबा फुगे विक्रेत्याजवळ पोहोचले. फुगा विक्रेता फुग्यात गॅस भरत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोट इतका भीषण होता की भार्गवी जागीच कोसळली.
 
गंभीर जखमी झालेल्या भार्गवीला तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमबाप्पेला मिळाले सहा वर्षांत पहिले रेड कार्ड, रिअल माद्रिदने अलाव्हेजवर 1-0 असा विजय मिळवला

मुंबईहून गोव्यात अवघ्या काही तासांत पोहचता येईल, नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी

उत्तर-मध्य नायजेरियात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू

ब्लू ओरिजिनने रचला इतिहास, पॉप स्टार केटी पेरीसह 6 महिला अंतराळ प्रवास करून परतल्या पेरी आणि किंग यांनी गुडघे टेकत जमिनीचे चुंबन घेतले

PBKS vs KKR: आयपीएलचा 31 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments