Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१२० फूट उंचीवरून दोन तरुणांनी धबधब्यात उडी घेतली, एकाचा मृत्यू; व्हिडिओ

Webdunia
सोमवार, 6 मे 2024 (11:17 IST)
महाराष्ट्रातील पालघर मध्ये एक दुःखद घटना घडली आहे. पालघर मधील जव्हार परिसरात प्रसिद्ध दाभोसा धबधब्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही तरुण धबधब्याजवळ अंघोळ करण्यासाठी गेलेत. या दरम्यान दोन तरुणांनी १२० फूट उंचीवर चढले व इथून त्यांनी थेट पाण्यात उडी घेतली. याचा व्हिडीओ त्यांच्या मित्रांनी फोन मध्ये रेकॉर्ड केला. 
 
धबधब्यात उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे माज शेख आणि जोएब आहे. माज शेख ज्याचे वय २४ आहे. उडी मारल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जोएब गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या मते, दाभोसा सरोवर फिरण्यासाठी मुंबई मधून मीरा रोडच्या कशिमीरी येथील 3 युवक आले होते तिघे मित्र होते. दोन तरुणांचा धबधब्यात उडी मारतांनाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

<

#waterfall #Maharashtra #viralvideo #aajkaviralvideo pic.twitter.com/VkuQ0ekYLF

— Khushbu Goyal (@kgoyal466) May 6, 2024 >मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही तरुणांनी कसा तरी माझ शेखला वाचवले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवले, मात्र त्याचा मृत्यू झाला. जोएबची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल केले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून शरीराचे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाची पोलिस चौकशी करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांचे जबाबही घेण्यात आले आहेत. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments