Festival Posters

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदची शपथ

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (18:52 IST)
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की.. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. तसेच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी आई वडिलांच्या स्मृतींना स्मरुन शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शपथ घेतली. तर सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शपथ घेतली.
 
शपथविधीनंतर शिवाजी पार्कवर आतषबाजी करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली होती. 
 
या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गॅस संकटादरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक, अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे कॅबिनेट मंत्र्यांना निर्देश

तैवानला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 येणार

LIVE: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत एक महत्त्वाचे विधान केले

विद्येच्या मंदिरात रक्तरंजित हल्ला; लग्न करण्यास नकार दिल्याने जुन्नरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला

पुढील लेख
Show comments