Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा ? आदित्य ठाकरे यांनी दिले हे संकेत

Webdunia
बुधवार, 22 जून 2022 (15:07 IST)
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण, शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास ४० आमदार असल्याचे स्पष्ट होत आहे. काहीही केल्या आमदार परत येत नसल्याने आणि भाजपसोबत जाण्याची गळ शिंदे यांनी घातल्याने उद्धव यांनी अखेर सत्ता सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, तसे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. कारण, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरील माहितीमधून पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री हा उल्लेख काढून टाकला आहे. केवळ युवा सेनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या आवडी निवडींसदर्भातील माहितीच त्यांनी दिली आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना आमदारांची बैठक बोलवली. मात्र, आदित्यसह केवळ १९ आमदारच बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट होत आहे. शिंदे समर्थक आमदार हे आता गुवाहाटीला गेले असून अपक्षांसह तब्बल ४० आमदारांचे समर्थन आमच्याकडे असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. कसोशीचे प्रयत्न करुनही शिंदे माघार घ्यायला तयार नाहीत. तसेच, भाजपसोबत जाण्याचा पर्याय निवडणे हे योग्य नाही. आता भाजपकडून विविध प्रकारच्या अटीशर्थी टाकून शिवसेनेला अधिक नामोहरम केले जाईल. आणि ते शिवसेनेला पटणारे नाही, अशी भूमिका उद्धव यांनी घेतल्याचे समजते. यासंदर्भात अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नसले तरी आज उद्धव हे राजीनामा देऊ शकतात, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments