Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा सोशल मीडिया पोस्टवरून पालकांना मोलाचा सल्ला

Webdunia
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (21:02 IST)
दिग्दर्शक प्रविण तरडे  यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. पण त्यापूर्वी प्रविण तरडेंनी याची सुरूवात स्वतःपासून केली आहे. फेसबुकवर प्रविण तरडेंनी आपल्या मुलासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये प्रविण तरडे आणि त्यांचा मुलगा सिंहगड किल्ल्यावर बसलेले आहेत. यावेळी प्रविण तरडे मुलाला लेखक रणजित देसाई यांची 'श्रीमान योगी' ही कादंबरी वाचून दाखवत आहे. 
 
शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशातील प्रत्येकानेच जाणून घ्यायला हवा. यासाठी पालकांनी आपल्या मुलांसाठी खास प्रयत्न करायला हवे. मुलांना आपण ट्रिपला घेऊन जातोच. पण यावेळी आपण त्यांना महाराष्ट्रातला इतिहास जवळून अनुभवण्यासाठी गडकिल्ल्यांवर नेलं तर त्याचा फायदा सर्वाधिक होईल. अशा आशयाची पोस्ट केली आहे. 
प्रविण तरडेंच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका .. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा .. आजची संध्याकाळ सिंहगडावर ...
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments