नेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर काँग्रेसला सत्ता मिळाली.
राजस्थानाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे जिंकल्या परंतू सचिन पायलटच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भरारी घेतली.
मागील वीस वर्षापासून राजस्थानात कोणत्याही पक्षाला सलग दोनदा सत्ता कायम ठेवता आली नाही. ही परंपरा यावेळी देखील कायम राहीली. राजस्थानाच्या जनतेने वसुंधराला नाकारले. दरम्यान वसुंधरा राजे झालरापाटन येथून विजयी झाल्या. त्यांच्याविरुद्ध भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह मैदानात होते.
राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा असून 199 जागांसाठी मतदान झाले होते. सर्व पक्ष मिळून 2274 उमेदवार मैदानात होते.