Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाल्मिक कराडांचा एनकाउंटर होऊ शकतो, विजय वडेट्टीवार काय म्हणाले...

Webdunia
गुरूवार, 2 जानेवारी 2025 (13:10 IST)
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावरून बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात वातावरण तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार तर काही ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.
 
या प्रकरणाचा जोरदार परिणाम अनेक ठिकाणी दिसून येत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराड यांच्या एनकाउंटर होऊ शकते, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.
 
 
रोहित पवार यांनी X वर लिहिले
शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून नवीन बेडच्या मागणीवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, 'बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच खाटांची ऑर्डर देण्यात आल्याचे वृत्त आहे, प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी नवीन खाटांची ऑर्डर दिल्याचे स्पष्ट केले असले तरी, आज अचानक बेडची ऑर्डर कशी दिली? असे अनेक प्रश्न आहेत. कर्मचाऱ्यांसाठी नवीन बेडची ऑर्डर दिली असेल, तर राज्यभरातील सर्व पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांसाठीही गाद्या, उशा, पंखे, एसी बसवता येतील का, याचाही विचार व्हायला हवा', असा दावा रोहित पवार यांनी केला आहे सोशल मीडियावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपींना भारतात आणणार, आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

अखेर काका आणि पुतणे पुन्हा एकत्र येण्यामागील कारण आहे तरी काय? 9 जानेवारीला जाहीर होणार!

जळगावच्या पालधी गावात हिंसक चकमकीनंतर संचारबंदी सुरू, मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात

कोण आहे Monkey Rani? भांडी धुण्यापासून ते पोळ्या बनवण्यापर्यंत घरातील सर्व कामे करते

LIVE: मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा मोठा दावा अजित पवार होणार पुण्याचे पालकमंत्री!

पुढील लेख
Show comments