suvichar

चमत्कार नाही तर तंत्रज्ञान, मुंबई - पुणे फक्त ३० मिनिटात

Webdunia
राज्य सरकारने मुंबई-पुणे प्रवास सर्वात कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक मोठा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, हा या वर्षीच्या २०१९च्या  अखेरपर्यंत सुरु होणार आहे. हे मोठे आणि महत्वाचे  काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन (Virgin Hyperloop One) अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे हा चमत्कारच ठरणार आहे. 
 
मुंबई ते पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त आणि फक्त  25 मिनिटात पूर्ण  करता येणार आहे. अर्थात  मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास पूर्ण वाचणार आहेत.  पुणे व मुंबईमधील अंतर हे जवळपास 150 किलोमीटर असून,  या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.सोबतच मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार असून, पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारला जाणार आहे. त्यामुळे आता स्वप्नवत वाटणारे आता प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठरणार असून त्यामुळे राज्य एका वेगळ्या प्रगतीच्या वाटेवर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांचा लोकांना सल्ला; म्हणाल्या...

Heat wave warning महाराष्ट्र जास्त का तापत आहे? विदर्भाने राजस्थानला मागे टाकले; भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला

ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा मिळणार की कठोरता वाढणार? बैठकीनंतर मराठी अनिवार्यतेबाबत मंत्री सरनाईक म्हणाले.....

न्यूझीलंडसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या

पुढील लेख
Show comments