Marathi Biodata Maker

८० टक्के पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:59 IST)
एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळून आला आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेत वाढ होण्याचा प्रकार भारतासह जगभरात दिसून आलेला आहे. भेसळयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्नाचे प्रमाण वाढल्यानेही ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव जाणवू लागला आहे.   आपल्या देशात व्हिटामिन कमतरता या विषयावर सर्वेक्षण केले गेले होते. तर यामध्ये धक्कदायक आकडे समोर आले असून १० पैैकी ८ पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची उणीव असल्याचे सिद्ध झाले आहे. सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व असे ओळख असलेल्या  ‘ड’ जीवनसत्त्व सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेमध्ये तयार होते. जीवनसत्त्वाच्या अभावामुळे खनिजांचे प्रमाण वाढून त्यामुळे हाडे ठिसूळ होऊ शकतात. त्यामुळे हाडांचे अनेक व्याधी सुद्धा जडतात तर अनेकांना चालणे मुश्कील होते. जसा डायबेटीस आपल्या देशात वाढला तसेच जीवनसत्त्वाची कमतरता आणि अभाव असलेल्या रुग्णांमध्ये भारतात वाढ होत आहे आसे समोर आहे. यामध्ये सर्वच वयातील नागरिक प्रभावित आहेत. आपल्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्याबाबत सामान्यांमध्ये जनजागृती झालेली दिसून येत नाही. त्यामुळे हाडांचे दुखणे कोणत्याही वयात हलके न घेता लगेच डॉक्टर गाठले पाहिजे. त्यामुळे भविष्यातील अनेक त्रास वेळीच दूर केले जाऊ शकतात.आणि नागरिक एक चांगले आयुष्य जगू शकणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वसईत महिला दिनी बॅगेत सापडली २० दिवसांची नवजात मुलगी

महाराष्ट्रातील शाळांमधील मुलींना लाठी आणि कराटे प्रशिक्षण दिले जाईल; योजना जून २०२६ मध्ये सुरू होणार

LIVE: महाराष्ट्रातील शाळांमधील मुलींना लाठी आणि कराटे प्रशिक्षण दिले जाईल

विश्वविजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने तिसऱ्यांदा पटकावला टी-२० वर्ल्ड कप

IND vs NZ: अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments