Dharma Sangrah

नांदेड : रिक्षाने मजुरीसाठी जात असताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्‍यू

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (08:09 IST)
अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीये नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. रोजच्‍या नित्‍यनियमाप्रमाणे नांदेडला रिक्षाने अनेकजण मजुरीसाठी जात होते. यानुसार ॲपेरिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. परंतु, कामावर पोहचण्यापुर्वीच रिक्षाला अपघात होवून काळाने घाला घातला.
 
नांदेड ते मुदखेड या मार्गावरन सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. नांदेड ते मुदखेड या मार्गावर  भीषण अपघात झाला. यात नांदेडकडे प्रवाशांनी भरलेली ॲपरिक्षा जात होती.
 
या वेळी नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्‍या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्‍य ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments