Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उर्फीच्या विकृतीची महिला आयोगाने स्वाधिकाराने दखल का घेतली नाही

Webdunia
गुरूवार, 5 जानेवारी 2023 (21:31 IST)
दुटप्पी महिला आयोगाला चित्रा वाघ यांचा रोखठोक सवाल
सार्वजनिक ठिकाणी हिडीस अंगप्रदर्शन करत समाजमनावर विपरित परिणाम करणा-या उर्फी जावेदवर ,महिलांचा मान व सन्मान जपण्याची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाने अद्याप स्वाधिकाराने दखल घेत कठोर कारवाई का केली नाही असा रोखठोक सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, प्रवक्ते गणेश हाके, नांदेड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष चित्ररेखा गोरे आदि उपस्थित होते. महिला आयोगाने या प्रकाराची दखल घेतली नसली तरी भाजपा उर्फीचा असा नंगानाच चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
 
श्रीमती वाघ म्हणाल्या की, उर्फीच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणा-या महिला आयोगाने ट्वीटरवरील बातमीवरून मराठी वेबमालिका ‘अनुराधा’ च्या अश्लील पोस्टरची स्वाधिकाराने दखल घेत तातडीने अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली. मात्र आयोगाला उर्फीचे कृत्य व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग वाटते,यावरून आयोगाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते.
 
लेकीबाळींवर, महिलांवर लैंगिक अत्याचार होत असताना आपण ज्या समाजात राहतो त्याचे स्वास्थ्य जपण्याची गरज आहे. उर्फी सारखी महिला हे स्वास्थ्य बिघडवत असताना तिच्यावर कारवाई करण्यात आम्हाला वेळ वाया घालवायचा नाही हे महिला आयोगाचे वक्तव्य धक्कादायक आहे.
 
शरीराचे ओंगळवाणे दर्शन घडवणारे उर्फीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना मूकदर्शकाचे काम करणा-या श्रीमती रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदी बसण्याचा अधिकार नाही आणि उर्फी प्रमाणेच महिला आयोग देखील बेफाम झाला आहे अशी घणाघाती टीका श्रीमती वाघ यांनी केली. अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाला राजकीय रंग चढवत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो हीन प्रयत्न होत आहे तो निंदनीय आहे असेही श्रीमती वाघ यांनी नमूद केले.
 
सार्वजनिक ठिकाणी होणारे असे ओंगळवाणे अंगप्रदर्शन रोखण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांची शिकवण, सावित्रीबाईंचे संस्कार जपण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्रित आवाज उठवण्याची गरज श्रीमती वाघ यांनी व्यक्त केली. कुणी सोबत येवो अथवा न येवो, समाजस्वास्थ्य जपण्यासाठी भाजपा विषय तडीस नेई पर्यंत लढायला सक्षम आहे असेही त्या म्हणाल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

पुढील लेख