Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसरी मुलगी झाल्यानंतर पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, परभणीतील घटना

arrest
Webdunia
शनिवार, 28 डिसेंबर 2024 (17:08 IST)
आज मुला आणि मुलीत काही भेद नाही असे म्हणतात आज मुली देखील मुलांप्रमाणे सर्व कामे करत आहे. पण आज देखील काही भागात मुलीच्या जन्मावर शोक केला जातो. परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला तिसरी मुलगी झाली म्हणून एका पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.  

सदर घटना महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परिसरात 26 डिसेंबरच्या रात्रीची आहे.  पत्नीने तिसऱ्यांदा पुन्हा मुलीला जन्म दिला याचा राग महिलेच्या पतीला आला आणि त्याने महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिले. 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला तीन मुली आहे. पत्नीने तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्याचा राग पतीच्या मनात होता. तो नेहमी पत्नीला मारहाण करत शिवीगाळ करायचा. 

26 डिसेंबरच्या रात्री दोघात वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. आरोपीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पालटवून दिले. महिला आरडाओरड करत सगळीकडे धावू लागली. काही लोकांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नांनंन्तर आगीवर नियंत्रण मिळवता आले मात्र तो पर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीची चौकशी सुरु केली आहे. या घटनेनन्तर परिसरात संतापाचे वातावरण आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारामागे सत्ताधारी लोक आहेत', विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर आरोप

नाशिकमध्ये बेकायदेशीर दर्गा पाडण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका पथकावर दगडफेक, अनेक पोलिस जखमी

नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कडक निर्णय

लाडक्या बहिणींना 1500 ते 500 रुपये देण्याच्या चर्चेवर महाराष्ट्राच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्टीकरण

एमसीए ने वानखेडे स्टेडियमच्या पॅव्हेलियनला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांचे नाव दिले

पुढील लेख
Show comments