Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही?, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं…

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (22:13 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यावर छापे टाकले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा छापे टाकत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काॅग्रेसचे  सर्वेसर्वा शरद पवार यांना माध्यमांनी केल्याने पवार यांनीही त्यांच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.
 
शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनी करावे.असे आम्ही 3 पक्षांनी मिळून ठरवले आहे.त्यामुळे इतर कोणत्या नावाचा विचार आम्ही केलेला नाही.त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरे कोणी या पदावर येणार नाही. असं स्पष्टच पवार यांनी सांगितलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यंमंत्री करण्यासाठी मी स्वतः आग्रही होतो.असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.
 
दरम्यान, या सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे 2-3 नावे होती.पण, आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यांचा हात मी स्वतः वर केला आणि ठाकरे हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील.असे जाहीर केल्याची आठवण त्यांनी या निमित्ताने सांगितले.महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता.त्यात माझाही किंचित वाटा होता, असं पवार यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments