Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार निवृत्ती घेणार?काय म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणून घ्या

शरद पवार निवृत्ती घेणार?काय म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणून घ्या
Webdunia
मंगळवार, 9 जानेवारी 2024 (16:29 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले आहे की, 80 वर्षांचे होऊनही काही लोकांना अद्याप निवृत्त व्हायचे नाही.वयाची 80 वर्षे असूनही काही लोकांचा राजकारणाचा भ्रमनिरास होत नाही. असे लोक निवृत्त व्हायला तयार नसतात.असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला.

या वर स्वतः शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना भाष्य केले. ते म्हणाले काय बोलावं आणि कसं  बोलावं हा ज्याच्या त्याच्या प्रश्न आहे. मी त्यावर काहीही बोलणार नाही. ज्यांना कोणाला एखाद्याचे वय काढायचे असेल तर ते काढू शकतात. माझ्या बद्दल बोलायचे म्हटले तर मी 1967 साली संसदीय राजकारणात आलो.तेव्हा पासून राजकारणातून एकदाही ब्रेक घेतले नाही. माझ्या कामाबद्दल कोणी विरोधी हा बोलत नाही.

मात्र व्यासाठी बोलायला तयार असतात.हे योग्य नाही. असं म्हणत शरद पवार यांनी विरोधांवर हल्ला चढवला. मी निवडणूक लढणार नाही असे मी जाहीर पणे सांगितले आहे. माझे आता या राजकारणात 1-2 वर्षेच राहिली आहे.

ते मी अर्धवट कसे सोडू.मी सध्या राज्यसभेत हे ते कसे काय अर्धवट सोडू. मला लोकांनी संसदेत पाठवले आहे.मी माझा कार्यकाळ आहे तो पर्यंत सेवा करणार जनतेची मदत करणे हे माझं काम आहे हे मी करणार. निवृत्ती घेतल्यावर मला करायला अनेक कामे आहेत. अनेक संस्थेत काम करता येईल . असं ते म्हणाले. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

जेजुरी मंदीरात ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला

LIVE: उद्धव ठाकरे म्हणाले 'जय श्रीराम' ला 'जय भवानी' ने उत्तर द्या

अदानींचे खिसे भरण्यासाठी बजेट,उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला

उत्तर समुद्रात मोठी दुर्घटना, दोन जहाजांची धडक 23 जणांचा मृत्यू

नागपुरात घरात आग लागल्याने 3 सिलिंडरचा स्फोट, महिला जखमी

पुढील लेख
Show comments