Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येरवड्यात होणार राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल

Webdunia
शनिवार, 8 मे 2021 (15:53 IST)
पुण्यातील येरवडा भागातील भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल बनविले जात आहे. राज्यातील हे पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण 200 बेडची सुविधा असणार आहे. त्यामध्ये ऑक्सीजन बेड की संख्या 150 तर आयसीयू बेड की संख्या 50 असणार आहे.
 
आमदार सुनील टिंगरे यांनी त्यांच्या आमदार फंडातून एक कोटी रुपयांचा फंड दिला आहे. सोबतच सीएसआर अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून दिला आहे. शुक्रवारी आमदार सुनील टिंगरे आणि अतिरिक्त मनपा आयुक्त रूबल अग्रवाल यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी आवश्यक सुविधांची माहिती घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
याबाबत माहिती देताना आमदार टिंगरे म्हणाले, कोरोनाच्या आतापर्यंत दोन लाटा आल्या आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दूसरी लाट जास्त भयंकर होती. आतापर्यंत मोठ्या व्यक्तिंसाठी हॉस्पिटल उपलब्ध आहेत, परंतु छोट्या मुलांना कोरोना संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचाराची मोठी समस्या होती. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी वर्तविली आहे.
 
यावेळी लहान मुलांना देखील संसर्ग होण्याची शक्यता आहे. म्हणूनच मनपाच्या येरवडा येथील हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल बनविले जात आहे. पुढील दोन महिन्यात त्याचे काम पूर्ण होईल. मग लहान मुलांवरील उपचार येथे केले जातील.
 
येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनचा प्लांट देखील बसविला जात आहे. त्याचेही काम चालू आहे. ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाल्यानंतर या हॉस्पिटलची गरज भागवून मनपाच्या दूसर्‍या हॉस्पिटलला ऑक्सिजन पाठवणे शक्य होणार आहे.
 
हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी प्रशासनास विविध सूचना दिल्या. तसेच काही अडचणी असल्यास तत्काल संपर्क करण्यास सांगितले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख