Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यु ट्यूब चे व्हिडियो पत्नीच्या जीवाशी पतीने केला खून

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (08:41 IST)
पत्नी ऑनलाईन यु ट्यूब वर व्हिडीओ पाहत असल्याने पतीने थेट तिची हत्या केली आहे. आर्थिक राजधानी मुंबई येथील अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला. पत्नीला वारंवार यूट्यूबवर व्हिडीओ पाहू नको असे सांगूनही ती व्हिडीओ पाहात होती. तिला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते, असे पतीचे म्हणत आहे. संबंधित घटना 10 एप्रिलला पहाटे अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात घडली असून, या प्रकरणातील नराधम आरोपी तीस  वर्षीय चेतन चौगुले पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासोबत झोपलला होता. पहाटे 4 वाजता आरोपी पती चेतनला जाग आली तेव्हाही त्याची पत्नी यूट्यूबवर व्हिडीओ पाहत असल्याचे त्याला दिसले होते. त्यामुळे चेतनला राग आला आणि त्याने व्हिडीओ पाहू नको असे भांडण सुरु केल. तर पत्नीने त्याचे काही न ऐकता व्हिडीओ पाहणे सुरुच ठेवले होते. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार मारामारी आणि झटापट झाली. त्यात या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पती स्वतः एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
 
चेतन चौगुले मागील काही महिन्यांपासून नोकरीची शोध घेत होता. नोकरी नसल्याने तो बे रोजगार होता. पोलिसांच्या चौकशीत चेतनने कबूल केले की, पत्नी आरतीला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचे व्यसन होते, त्यामुळे घरातील कामात तिचे लक्ष नव्हते. ती रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्येच व्यस्त असायची. यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले. मात्र, पत्नी वारंवार मुलासह माहेरी जाण्याची धमकी द्यायची.’हे सर्व जरी असले तरी या पतीने शुल्लक कारणावरून आपला राग पत्नीवर काढला आहे. त्यामुळे त्यांचा दोन वर्षीय मुलगा आता आईला आणि बापाला मुकला आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments