Dharma Sangrah

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी Bhavpurna Shradhanjali Message in Marathi

Webdunia
मंगळवार, 11 एप्रिल 2023 (17:11 IST)
असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली
 
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. 
तरी देखील मन ... जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. 
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
 
आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, 
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. 
भावपूर्ण श्रद्धांजली
 
देव मृत आत्म्यास शांती देवो
कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो
भावपूर्ण श्रद्धांजली
 
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले
आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे
भावपूर्ण श्रद्धांजली 
 
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे… 
आई आज आमच्यात नाहीस यावर विश्वासच बसत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली 
 
आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते… 
घरातील प्रत्येक गोष्ट बघून तुझी खूप आठवण येते… 
भावपूर्ण श्रद्धांजली 
 
नि:शब्द… 
भावपूर्ण श्रद्धांजली.. 
देव मृतात्म्यास शांती देवो
 
अस्वस्थ होतयं मन
अजूनही येते आठवण बाबा 
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध 
दररोज दरवळत राहो 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली
 
बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस.. 
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तुझी जागा सदैव खास आहेस...
भावपूर्ण श्रद्धांजली
 
जीवन हे क्षणभंगुर आहे
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो
 
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, 
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी, 
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…
 
गेलेली व्यक्ती परत येत नाही.. 
पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते.. 
भावपूर्ण श्रद्धांजली
 
तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळ निर्माण झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
 
.... आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
 
मृत्यू अटळ आहे तो रोखू शकत नाही.. 
पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही.. 
भावपूर्ण श्रद्धांजली
 
तू सोबत नसलास तरी
तुझ्या आठवणी सोबत राहतील,
भावपूर्ण श्रद्धांजली
 
सर्वांचे लाडके …… यांना देव आज्ञा झाली. 
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. 
भावपूर्ण श्रद्धांजली
 
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे हीच प्रार्थना की 
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो
भावपूर्ण श्रद्धांजली! 
 
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भारतीय समाजात घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे? नाते वाचवण्यासाठी काही सोपे प्रयत्न

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

पुढील लेख