Marathi Biodata Maker

Relationship Tips :डेटिंगला जाण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (21:25 IST)
Relationship Tips :पूर्वीच्या काळी, जेव्हा मुला-मुलींची लग्ने ठरलेली असायची, तेव्हा बरेच लोक त्यांच्या जोडीदारालाही पाहू शकत नव्हते, लग्नानंतरच मुले आपल्या जोडीदाराला बघायचे.मात्र, यानंतर काळ बदलला आणि मुलं आपल्या इच्छा कुटुंबासमोर ठेवू लागले,आता मुलं प्रेमविवाहही करतात.पण अरेंज मॅरेज असेल तर लग्नापूर्वी डेटिंगला जातात. एकमेकांना जाणून घेण्यासाठी भेटतात. आजकाल मुले आणि मुली अनेक डेटिंग अॅप्स, सोशल मीडिया आणि इतर पद्धतींद्वारे एकमेकांना भेटतात आणि डेट करतात. यानंतर अनेक जोडपी लग्नही करतात. एखाद्या अनोळखी मुला सोबत डेटिंगला जाण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या. नाहीतर एक लहानशी केलेली चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते. डेटिंगला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. 
 
एकटे भेटू नका- 
डेटिंगला जाताना कधीही एकटे जाऊ नका. आपल्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला फॉलो करायला सांगा. एखादी गोष्ट चुकीची होताना दिसली तर त्यावर तातडीनं कारवाई करा. 
 
मोबाईलला अलर्ट मोडवर ठेवा- 
मोबाईल तुम्हाला खूप मदत करू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा मोबाईल अलर्ट मोडवर ठेवा.बंद करू नका, घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोबाइलची बॅटरी पूर्णपणे चार्ज करा, विश्वासू मित्राचा किंवा पोलिसांचा नंबर डायल करून ठेवा. काहीही चुकीचे होत असल्यास तातडीनं कारवाई करा. तुम्ही आपल्या जागेची लोकेशन देखील सुरु ठेवा. जेणे करून तुम्हाला गरज पडल्यास कोणीही तुमचा मागोवा घेऊ शकेल. 
 
निर्जनस्थळी भेटू नका- 
ज्यावेळी तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटायला जात असाल, तेव्हा चुकूनही त्याला अनोळखी किंवा निर्जन ठिकाणी भेटू नये, हे लक्षात ठेवावे. नेहमी सार्वजनिक ठिकाणी भेटा. असे केल्याने तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेऊ शकाल.
 
व्यक्ती आणि भेटण्याचं ठिकाण कळवा -
जेव्हाही तुम्ही डेटवर जाल तेव्हा तुमच्या जोडीदाराला भेटत असलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती द्या. तसेच, तुम्ही जात असलेल्या ठिकाणाबद्दल आम्हाला सांगा. याचा अर्थ असा होईल की जर तुम्ही कोणत्याही अडचणीत सापडलात तर तुम्हाला वेळीच मदत मिळू शकेल.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

Guava Candy पेरू पासून बनवा गोड, चविष्ट आणि आरोग्यदायी कँडी

Sunday Born Baby Boy Names रविवारी जन्मलेल्या मुलांसाठी सूर्यदेवाशी संबंधित युनिक आणि अर्थपूर्ण नावे

ओमेगा 3 फॅटी अॅसिड या पदार्थातून देखील मिळते, आहारात समाविष्ट करा

पुढील लेख
Show comments