Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Narali Purnima 2024 नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?

Webdunia
सोमवार, 19 ऑगस्ट 2024 (08:00 IST)
Narali Purnima 2024 श्रावण मासाची पौर्णिमाला आपण रक्षा बंधन म्हणून साजरी करतो हे तर सगळ्यांना माहित असेल. पण ह्या दिवशी 'नारळी पौर्णिमा' ही देखील साजर केली जाते. 'नारळी पौर्णिमा' ऐक उत्सव आहे ज्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमाच्या दिवशी साजरी करण्याची पद्दत आहे.
 
श्रावण मास स्वतःमध्ये एक पवित्र मास आहे आणि त्यात श्रावणी पौर्णिमा आणखीन पवित्र मानली जाते. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील दमण आणि दीव, ठाणे, रत्नागिरी, कोकण इत्यादी महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. मूळात महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिमी क्षेत्रामध्ये, कोकण तट येथे कोळी समुदायाचे लोकांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.
 
नारळाचे महत्व:
ह्याला 'नारळी पौर्णिमा' हे नाव नारळामुळे मिळालं आहे. कारण ह्या दवशी नारळचा खूप महत्व असतं. ह्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केलं जातं आणि नारळ भात याचं पूजेत महत्तव असतं. नारळ फळ हिंदू मान्यतेप्रमाणे सगळ्यात शुभ मानलं जातं. ह्याचं एक कारण असे देखील आहे की त्याचा प्रत्येक भाग जसे पाणी, पानं, फळ, केस सगळे कामास येतात. म्हणून पारंपारिकपणे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे शुभ मानले जाते. तसेच मासेमारी आणि जल-व्यापारच्या सुरुवात करण्याआधी नारळ अर्पित केलं जातं.
 
संस्कृती आणि मान्यता
नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे, कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे कारण ते त्यांच्या आयुष्य चालावण्याचे साधन आहे. तसेच नाव पण त्यांच्या आयुष्याचा  अविभाज्य अंग आहे त्यामुळे ते नावाची देखील पूजा करतात.
 
हा सण कोळी लोकांमध्ये मासेमारी आणि जल-व्यापाराची सुरुवात ठरवतो. पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोकं समुद्र-देव वरुण यांची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजन करतात. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे. अशात कोळी लोकं काही काळासाठी मासेमारी थांबवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाही.
 
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडलं जातं. समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्र भरतीच्या वेळी, समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचा नैवेद्य म्हणजे त्याचा राग शांत करण्यासाठी अर्पण केला जातो असे मानले जाते.
 
हा सण साजर करण्याची तयारीच्या रूपात कोळी आपली नाव सजवतात, त्यांना रंग-रोगण करतात आणि नाववर फुलांची माळा त्यांना अजूनच आकर्षित बनवते. ह्यादिवशी नारळाची करंजी देखील बनवली जाते. लोकं पारंपारिक पोशाखात पारंपारिक नृत्य देखील करतात, ज्याला 'कोळी नृत्य' म्हणतात.
 
विविधतेत सुंदरता 
हा दिवस ज्याला मुख्यतः 'रक्षा बंधन' म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकण तट येथे 'नारळी पौर्णिमा' म्हणतात, भारताचे वेग-वेगळ्या भागात 'राखी पौर्णिमा', श्रावणी पौर्णिमा', 'उपाकर्म' किंवा 'अवनी अवित्तम' म्हणून देखील साजर केला जातो.
 
जसे रक्षा बंधन भाऊ बहिणीचे अतूट बंधनाचा सण आहे त्याप्रकारे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र ह्यांच्यामधील असलेल्या बंधनाचा सण आहे.
 
एकाच उत्सवाचे इतके वेगळे नाव आणि पद्धत हेच तर आपल्या देशाची 'विविधतेत एकता' दर्शवते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी गजानन महाराजांच्या भक्तांना पाठवा हे भावपूर्ण संदेश Gajanan Maharaj Status Guruvar

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

आरती गुरुवारची

गुरुवारी नृसिंह मंत्र जपा, जीवनातील पाप नाहीसे होतील

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments