Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुमित नागलची उत्कृष्ट कामगिरी,पेरुगिया चॅलेंजरच्या उपांत्य फेरीत

Webdunia
रविवार, 16 जून 2024 (10:32 IST)
भारतीय टेनिसपटू सुमित नागलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत शुक्रवारी पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित नागलने उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित पोलंडच्या मॅक्स क्रॅस्निकोव्स्कीवर 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
 
शनिवारी उपांत्य फेरीत नागलचा सामना उपांत्यपूर्व फेरीतील बिगरमानांकित स्पेनच्या बर्नाबे झापाटा मिरालेस आणि द्वितीय मानांकित सर्बियाच्या लास्लो जरे यांच्यातील विजेत्याशी होईल. जर्मनीमध्ये हेल्ब्रॉन चॅलेंजर सुरू झाल्यापासून नागलचा हा सलग आठवा विजय आहे.
 
नागलने याआधी प्राथमिक फेरीत बोस्निया-हर्जेगोव्हिनाच्या बिगरमानांकित नॉर्मन फाटिकवर आणि नंतर उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या बिगरमानांकित अलेसेंड्रो ग्यानेसीवर विजय मिळवला होता. गेल्या आठवड्यात, नागलने हेलब्रॉन चॅलेंजर विजेतेपद जिंकले, या मोसमातील त्याची दुसरी चॅलेंजर ट्रॉफी. त्याने फेब्रुवारीमध्ये चेन्नई चॅलेंजर जिंकले होते. नागल सध्या एटीपी एकेरी क्रमवारीत 77व्या स्थानावर असून, पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचे स्थान निश्चित आहे

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

तुकाराम महाराज पालखी आज निघणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सीएम पदासाठी मंथन, या नावांची चर्चा

सेंगोल म्हणजे नेमकं काय? तो पुन्हा चर्चेत यायचं कारण काय?

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 ची छत कोसळली, 1 ठार, अनेक जखमी

Chess : भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशची क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सुरुवात

सर्व पहा

नवीन

बेरोजगारांना नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्याना अटक

शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या क्लिनचिट ला विरोध

अजित पवारांना महायुतीतून वगळण्याची मागणी केली, भाजप नेते म्हणाले

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही,काँग्रेसचे वक्तव्य

मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात टळला, महिला घसरून समुद्रात पडली, सुदैवाने वाचली

पुढील लेख
Show comments