Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फुटबॉल वर्ल्ड कपचा हीरो पापा बाउबा डिओपचे निधन

Webdunia
मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (13:54 IST)
दिएगो मॅराडोना यांच्या निधनाने फुटबॉल वर्तुळात शोकाकुल वातावरण असताना आणखी एका स्टार खेळाडूने जगाचा निरोप घेतला आहे. सेनेगल फुटबॉल संघाचा  मिडफिल्डर पापा बाउबा डिओप याचे रविवारी रात्री 42 व्या वर्षी निधन झाले. 2002 च्या  वर्ल्ड कप स्पर्धेत बाउबाच्या गोलने वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला होता.

तो बर्‍याच दिवसांपासून आजारी होता. बाउबाने 2001 ते 2008 या कालावधीत 65 सामने खेळले. सेनेगलला 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्पूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आतापर्यंत तीन आफ्रिकन देशांनी वर्ल्ड कपच्या अंतिम 8 संघांमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी एक सेनेगल आहे.

बाउबाने 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या फ्रान्सविरुद्ध विजयी गोल केला होता. त्यानंतर उरुग्वेला 3-3 असे बरोबरीत रोखून आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. उपांत्यपूर्व  फेरीत त्यांना टर्कीकडून पराभव पत्करावा लागला. बाउबाने चारवेळा आफ्रिका चषक राष्ट्रीय  स्पर्धेत सेनेगलचे प्रतिनिधित्व केले आणि 2002 मध्ये त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
2004 मध्ये त्याने इंग्लिश क्लब फुल्हॅचे प्रतिनिधित्व केले आणि 2008 च्या एफए चषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता.  

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments