Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बजरंग पुनियाचे डोपिंग टेस्ट न केल्यामुळे तात्पुरते निलंबन

Webdunia
रविवार, 5 मे 2024 (15:39 IST)
भारतीय पुरुष कुस्तीपटू बजरंग पुनिया याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) तात्पुरते निलंबित केले आहे. बजरंगने 10 मार्च रोजी सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणी दरम्यान डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
बजरंगवरील निलंबन वेळीच उठवले नाही तर तो पुढील महिन्यात होणाऱ्या निवड चाचणीसह कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. बजरंगने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याची माहिती आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीयाला 65 किलो गटात ऑलिम्पिक कोटा मिळालेला नाही. 
 
बजरंगने सोनिपत येथे झालेल्या चाचणीत डोप टेस्ट देण्यास नकार दिला नाडा ने या बाबतची माहिती जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेला दिल्यावर त्यांनी नाडाला बजरंगला नोटीस पाठवून चाचणीला नकार का दिल्याचे उत्तर मागितले. नाडा कडून बजरंगला नोटीस बजावण्यात आली. आणि 7 मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. आणि जो पर्यंत बजरंग पुनिया बाबत अंतरिम निर्णय होत नाही तो पर्यंत त्याला कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. पॅरिस ओलम्पिकसाठी 65 किलो वजनी गटात पात्र ठरणे हे बजरंगचे स्वप्न होते ते आता भंगले आहे.  

या किटची मुदत संपल्याचा आरोप करत बजरंगने काही महिन्यांपूर्वीच एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये डोप कलेक्शन किट संपल्याचा आरोप केला होता. NADA ने एका निवेदनात म्हटले आहे की, “बजरंगला या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अंतिम निर्णयापर्यंत कोणत्याही स्पर्धा किंवा चाचणीमध्ये भाग घेण्यापासून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.

Edited By- Priya Dixit   
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही- एकनाथ शिंदे

सांगलीमध्ये भाजप-आरएसएस बद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान

LIVE: अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाशिम मध्ये MVA चा तणाव वाढला, शिवसेना UBT चे उमेदवार राजा भैय्या पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments