Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाऊनमध्ये केवळ एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला, जाणून घ्या माहिती

change your address in aadhar card
Webdunia
बुधवार, 29 एप्रिल 2020 (19:46 IST)
कोरोनाच्या संक्रमणकाळात लॉकडाऊन असल्यामुळे सगळे घरामध्ये बसले आहेत. आज आपली सर्व महत्त्वाची कामे अडकलीत आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचे काम आहे आपल्या आधार पत्रकामध्ये चुकीचा पत्ता असल्यास त्यामध्ये बदल करणे. होय आपणं घरी बसून देखील आपल्या आधार कार्ड किंवा पत्रकांमध्ये पत्ता सुद्धा बदलू शकता.
 
आधारासाठी त्याच्या अधिकृत संस्थे UIDAI ने ट्विट करून सांगितले आहे की आपण घरात बसून देखील आपल्या आधार पत्रकामध्ये आपला पत्ता बदलू शकता. या साठी आपल्या जास्त काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्याला आपला फोटो मोबाइलने काढून त्याला अपलोड करावं लागणार. UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वर एका व्हिडिओद्वारे याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याला बघून आपल्याला सोप्यारीत्या आपला पत्ता अपलोड करू शकता. 
 
ट्विट मध्ये माहिती दिली : UIDAI ने आपल्या ट्विट मध्ये सांगितले आहे की आपल्या सहाय्यक दस्तऐवजीचे (सर्पोटिंग डाक्युमेंट्स) चे रंगीत फोटो काढून आपल्या फोनने अपलोड करावं. या व्हिडिओमध्ये आपल्या घराचा पत्ता बदलविण्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितल्यानुसार सर्वात आधी https://uidai.gov.in/ वेबसाइटला भेट द्या आणि त्यामध्ये 'Online Address Update' वर क्लिक करावं. आपला पत्ता टाकावा आणि सहाय्यक दस्तऐवजाची कलर स्कॅन फाइल अपलोड करावं. 
 
या प्रक्रियेचे अनुसरण करावं  : आपल्याला आपला ऑनलाईन पत्ता बदलण्यासाठी या https://uidai.gov.in/ संकेत स्थळावर जावे लागणार. त्या नंतर आपल्याला My Adhaar या टॅब वर क्लिक करावे लागेल. 
आता आपल्याला ड्रॉपडाऊनच्या दुसऱ्या टॅब वर Update Your Aadhaar मध्ये जावे लागणार. येथे आपल्याला अजून एक तिसऱ्या ऑप्शनला Update Your Address Online ला क्लिक करावे. 
या नंतर एक नवे पान आपल्या समोर येईल. या पानावर खालील बाजूला Proceed to Update Address वर क्लिक करा. या नंतर आपल्याला आपले आधार नंबर, captcha व्हेरिफिकेशन द्यावे लागतील. असे केल्याने आपल्याकडे ओटीपी नंबर येईल. हा ओटीपी नंबर  देऊन लॉगिन वर जाऊन क्लिक करा.
या नंतर आपल्याला इथे Update Address Via Address Proof चे विकल्प मिळेल. या विकल्पाची निवड केल्यावर एका नवीन पानावर आपल्याला आपला नवीन पत्त्याची माहिती द्यावी लागणार. 
ह्याचबरोबर आपल्याला काही महत्त्वाचे दस्तऐवजसुद्धा जमा करावे लागणार. आपल्या ऑनलाईन व्हेरिफिकेशन नंतर आपल्या आधार कार्डामधील पत्ता बदलविण्यात येईल. तसेच आपले नवीन आधार कार्ड आपल्या नव्या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी आपण UIDAI च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी, राज्यात म्हाडा १९,४९७ घरे बांधणार आहे; मुंबईत ५,१९९ घरे बांधणार

मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडर्स उडवण्यास एका महिन्यासाठी बंदी

LIVE: Waqf Amendment Bill लोकसभेत अमित शहांनी दिला कोल्हापूर आणि बीडमधील महादेव मंदिरांचा संदर्भ

हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही? उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार टोला

जळगावमध्ये झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू, २२ जण जखमी

पुढील लेख
Show comments