Festival Posters

आता व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करा, विशेष मोहीम सुरु

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (21:30 IST)
व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली. ते म्हणाले की, मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी विद्यमान मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी 1 ऑगस्ट 2022 पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
 
या विशेष मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.
 
आधार कार्ड नसेल तर?
मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबूक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र/राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार/खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या 11 पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.
 
मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नवी मुंबईत भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र उभारले जाणार

सुपर चेस क्लासिकच्या सलामीच्या सामन्यात प्रज्ञानंद फिरौजाविरुद्ध खेळणार, गुकेशने माघार घेतली

नवी मुंबईत भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र उभारले जाणार, सिडको आणि एआयईएफ यांच्यात मोठा करार

IMDचा मुसळधार पावसाचा इशारा: या राज्यांसाठी 'Heavy Rain Alert '; २१ मे पर्यंत अशीच हवामान स्थिती कायम राहणार

चाळीसगाव येथे लसीकरणानंतर अडीच महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments