Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑनलाइन ट्रांसफर करा PF चे पैसे काही मिनिटाचे काम

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (15:35 IST)
जर आपण अलीकडेच नोकरी बदलली असेल तर पीएफ खात्यात जमा रक्कम संबंधित दोन पर्याय आहेत. आपण पीएफ अकाउंटमधून जमा राशी काढू शकता किंवा नवीन पीएफ अकाउंटमध्ये ट्रांसफर करु शकता. पीएफचे पैसे घरी बसल्या काही मिनिटात ट्रांसफर करता येतात. यासाठी सर्वात आधी खातेधारकाला त्याचे यूएएन सक्रिय करावे लागेल.
 
याशिवाय खातेधारकाचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर सर्व तपशील सत्य व योग्य असावेत. आपण पीएफचे पैसे ऑनलाईन कसे हस्तांतरित करू शकता हे ट्विट करुन ईपीएफओने सांगितले आहे तर आपण अलीकडेच आपली नोकरी बदलली असेल किंवा आपल्याला आपले पीएफ पैसे इतर कोठे हस्तांतरित करायचे असतील तर आपण ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे, आपले काम घरी बसून सहज केले जाईल.
 
ऑनलाईन पीएफ हस्तांतरणासाठी अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम आपल्याला युनिफाइड मेंबर पोर्टलला (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface) भेट देण्याची आवश्यकता आहे. नंतर आपण आपल्या यूएएनसह लॉग इन करा.
 
- ऑनलाइन सर्व्हिससाठी वन मेंबर वन इपीएफ यावर क्लिक करावं लागेल.
 
- आता आपल्याला विद्यमान कंपनी आणि पीएफ खात्याशी संबंधित माहिती सत्यापित करावी लागेल.
 
- नंतर गेट डिटेल्स वर क्लिक करा. शेवटच्या मागील नियुक्तिची पीएफ खात्याचा तपशील तुम्हाला दिसेल.
 
- मागील कंपनी आणि सद्य कंपनी यापैकी आपल्याला निवड करावी लागेल. दोनपैकी कोणतीही एक कंपनी निवडा आणि मेंबर आयडी किंवा यूएएन द्या.
 
- शेवटी, गेट ओटीपी पर्यायावर क्लिक करा, ज्याने आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
 
- आपल्या ईपीएफ खात्याची ऑनलाइन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 
पीएफ हस्तांतरित करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
ईपीएफओचे कर्मचार्यांचे यूएएन पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर सक्रिय असले पाहिजे.
सक्रिय करण्यासाठी वापरलेला मोबाइल नंबर देखील सक्रिय असणे आवश्यक आहे कारण या नंबरवर ओटीपी पाठविला जाईल.
कर्मचार्‍याचा बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक त्याच्या / तिच्या युएएनशी जोडला गेला पाहिजे.
मागील नियुक्तिची तारीख डेट ऑफ एग्जिटआधीपासून असावी. नसेल तर आधी ते करा.
ई-केवायसीला नियोक्ताने आधीपासूनच मान्यता दिली पाहिजे.
मागील सदस्य आयडीसाठी केवळ एक हस्तांतरण विनंती स्वीकारली जाईल.
अर्ज करण्यापूर्वी, सदस्य प्रोफाइलमध्ये दिलेली सर्व वैयक्तिक माहिती सत्यापित करा आणि त्याची पुष्टी करा.
 
आपल्या जुन्या पीएफ खात्याला ट्रॅक करा
आपण भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीचे नियोजन करत असाल तर ईपीएफचे नियम जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आपल्याला नियम माहित नसल्यास अशा परिस्थितीत आपले नुकसान होऊ शकते. बर्‍याच लोकांसोबत असे घडते की वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताना वेगवेगळी पीएफ खाती असतात. यामुळे जुने पीएफ खाते इन-ऑपरेटिव होतं. तथापि, ईपीएफओने आता एकच पीएफ खातं सुरू ठेवण्याचा पर्याय दिला आहे. आता नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर देखील कर्मचा्याला जुना पीएफ नंबर द्यावा लागेल. अशाने कोणतेही पीएफ खातं इनऑपरेटिव होणार नाही. इन-ऑपरेटिव अकाउंट ट्रॅक करणे जरा अवघडं आहे तरी याला ट्रॅक करता येतं. अकाउंट ट्रॅक झाल्यावर यात जमा रक्कम ट्रांसफर करता येते. 
 
कशा प्रकारे ट्रॅक कराल अकाउंट
सर्वात आधी पीएफची वेबसाइट www.epfindia.gov.in वर जा.
येथे इन-ऑपरेटिव अकाउंट हेल्पडेस्क ऑप्शन निवडा.
या बॉक्समध्ये आपल्या समस्येबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
यानंतर आपल्याला वैयक्तिक माहिती, नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, वाढदिवस, नवरा किंवा वडिलांचे नाव, मालकाचे नाव भरावे लागेल.
या सर्व माहितीच्या मदतीने आपलं खातं सहज शोधता येऊ शकतं. एकदा खाते शोधल्यानंतर निधी काढता येतो किंवा हस्तांतरित केला जाऊ शकतो.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments