Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Happy Chocolate Day 2022: चॉकलेट खाण्याचे 7 फायदे जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (20:41 IST)
9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. नात्यात गोडवा आणण्यासाठी चॉकलेट हे एक कारण मानले जाते. चॉकलेट आणि प्रेमाच्या संबंधावर अनेक संशोधन झाले आहेत, ज्यानुसार असे मानले जाते की चॉकलेट खाल्ल्याने लव्ह लाईफ निरोगी राहते. वैज्ञानिकदृष्ट्या ,चॉकलेटमध्ये असलेले थिओब्रोमाइन आणि कॅफीन मेंदूत एंडोर्फिन सोडतात,ज्यामुळे मन आणि शरीराला आराम वाटतो.
 
चॉकलेट ही केवळ लहान मुले आणि तरुणींची पसंती नसून आता वाढदिवस किंवा कोणत्याही समारंभात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्येही चॉकलेटचा समावेश झाला आहे. इतके आकर्षक आणि विविध फ्लेवर्स उपलब्ध आहेत की चॉकलेट बघून ते खाण्यापासून तरी आपण  स्वतःला रोखू शकत नाही. पण आपणास हे  माहित आहे का की चॉकलेटचे फक्त चवीपेक्षा जास्त फायदे आहेत. आम्ही इथे आपल्याला चॉकलेटचे असेच काही फायदे सांगत आहोत, जे जाणून आपण ही स्वतःला चॉकलेट खाण्यापासून रोखू शकणार नाही.  
 
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या चॉकलेट्समध्ये डार्क चॉकलेट सर्वोत्तम आहे. त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी किंवा कमी असते आणि हे चॉकलेट तुमच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असते. चला तर मग याचे 7 फायदे जाणून घेऊ या. 
 
1 तणाव असो वा नैराश्य -आपण कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असाल तर चॉकलेट हे आपले मित्र आहे,हे आपला तणाव कमी करतात. जेव्हा आपण तणाव किंवा नैराश्यात असतो तेव्हा चॉकलेट खायला विसरू नका. यामुळे आपल्याला आराम वाटेल. 
 
2 त्वचा तरूण ठेवते -चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या त्वचेवर दिसणाऱ्या सरत्या वयाची चिन्हे आणि सुरकुत्या कमी करतात. यामुळे आपली त्वचा तरुण दिसते. चॉकलेटच्या गुणधर्मांमुळे, सध्या चॉकलेट बाथ, फेशियल, पॅक आणि वॅक्स देखील वापरले जात आहेत.  
 
3  रक्तदाब कमी असल्यास -ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी चॉकलेट खूप फायदेशीर आहे. लो ब्लड प्रेशरमध्ये चॉकलेट लगेच आराम देते. म्हणूनच चॉकलेट नेहमी सोबत ठेवा. 
 
4 कोलेस्ट्रॉल -शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चॉकलेट खूप फायदेशीर आहे. एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करून लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या इतर आजारांवर नियंत्रण ठेवण्यासही हे उपयुक्त आहे.  
 
5  मेंदू निरोगी राहते - एका संशोधनानुसार, दररोज दोन कप हॉट चॉकलेट ड्रिंक प्यायल्याने मेंदू निरोगी राहतो, आणि स्मरणशक्ती कमजोर होत नाही. चॉकलेट मेंदूतील रक्ताभिसरण सुधारते.
 
6 हृदयरोग- एका संशोधनानुसार, चॉकलेट किंवा चॉकलेट ड्रिंकच्या सेवनाने हृदयविकाराची शक्यता एक तृतीयांश कमी होते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
 
7 एथेरोस्क्लेरोसिस - एथेरोस्क्लेरोसिस हा एक प्रकारचा रोग आहे, ज्यामध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. अशा परिस्थितीत चॉकलेट खाणे खूप फायदेशीर आहे. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments