Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोज डे : मन जोडणारे फुल!

Webdunia
प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील रोज डेचा एक वेगळात महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फुल देण्यामागचा अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हे जाणून घेऊ आणि आपणही रंगीबिरंगी गुलाबांसोबत रोज डे साजरा करू या.
 
पांढरा गुलाब
लवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ प्रेमाचे प्रतीक मानला जातो. 
 
लाल गुलाब 
लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. हे 'माझे तुझ्यावर प्रेम आहे ' हा संदेश हा गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा खरा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात. 
 
पिवळा गुलाब
माझ्याशी मैत्री करशील काय? हेच जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. पिवळ्या रंगाच्या गुलाबाचे गुच्छ देणे सांगते की तू माझा जीवलग मित्र/मैत्रीण होतास आणि कायमस्वरूपी राहशील. तुम्ही अनोळखी व्यक्तीला हा गुलाब भेट दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते. 
 
गुलाबी गुलाब
हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखादी व्यक्ती आणि त्याचा स्वभाव आवडत असेल तर त्याला या रंगाचा गुलाब भेट देऊ शकता. तू मला आवडतोस हा संकेत गुलाबी गुलाब देते. 
 
अशा पद्धतीने प्रत्येक गुलाब आपला वेगळा भाव आणि त्यातील प्रेम प्रदर्शित करतो. या प्रकारे काही फुले निवडून तुम्ही तुमचा रोज डे साजरा करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

चटपटीत चिकन फ्रेंच फ्राईज रेसिपी

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

कन्सीलर लावल्याने चेहऱ्यावर तडे येतात, या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

पुढील लेख
Show comments