विठू तुझी हाक माझ्या कानावर आली, कधी जातो असं झालं, तहान भूक हरपली. निघालो भान हरपून वाट धरली वारीची , डोळ्यांना लागली आस तुझ्या दर्शनाची, माय बाप तू लेकराचा, पदरी मज घ्यावं , होईल जीवन सार्थक,त्याच सोनं पायी तुझ्या व्हावं! संकट मजवर येता,लीलया ते झेलशील! माऊली तू माझी वेगेवेगे धावत...