Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Look Back Entertainment 2024 : शाहरुख, सलमान सहित या अभिनेत्यांपैकी एकाचाही चित्रपट यावर्षी प्रदर्शित नाही झाला

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (16:02 IST)
Look-Back-Entertainment : 2024 वर्ष संपायला आता काही दिवस उरले आहे. या वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून ज्यांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. तसेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांचा एकही चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला नाही. तसेच याशिवाय आयुष्मान खुराना आणि रणबीर कपूरचा एकही चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही. तसेच अशा 9 अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊ या ज्यांचा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला नाही.
 
अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, राम चरण, आयुष्मान खुराना, चिरंजीवी, पवन कल्याण, अजित कुमार, पवन कल्याण यांच्या चाहत्यांची निराशा झाली कारण यांचे एकही चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाले नाही. 
तसेच शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान या सुपरस्टारचे देखील चित्रपट यावर्षी प्रदर्शित झालेले नाहीत. शाहरुख शेवटचा पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटात दिसला होता. तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जवान आणि पठाण बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होते. तर आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या शेवटच्या वर्षी 2023 आणि या वर्षी 2024 मध्ये एकही सिनेमा आला नव्हता. याशिवाय सलमान शेवटचा 2023 मध्ये 'टायगर 3' मध्ये दिसला होता. पण, भाईजान सिंघम अगेन आणि बेबी जॉनमध्ये कॅमिओ भूमिकेत दिसला आहे.
 
तसेच रणबीर कपूरचा चित्रपटही यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही.रणबीर कपूरचा 'एनिमल' हा चित्रपट गेल्या वर्षी 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि खूप कमाई केली. या चित्रपटात बॉबी देओलच्या भूमिकेचीही खूप चर्चा झाली होती. या वर्षी 2024 मध्ये त्यांचा एकही चित्रपट येणार नाही. तर पुढच्या वर्षीही त्यांचा एकही चित्रपट येणार नाही. अभिनेत्याचे 'रामायण भाग 1' आणि 'लव्ह अँड वॉर' 2026 मध्ये रिलीज होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांनी बेस्ट बस प्रकरणी ड्रायव्हरला अटक केली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

LIVE: मुंबई पोलिसांनी बेस्ट बस प्रकरणी ड्रायव्हरला अटक केली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वांद्रे येथील काही भागात आज पाणीपुरवठा होणार नाही, बीएमसीने दिले कारण

IND vs AUS: मोहम्मद सिराजला आयसीसीने दंड ठोठावला

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला खुलासा, कुर्ला बस अपघाताला जबाबदार कोण?

पुढील लेख
Show comments