Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

योग टिप्स : योग करताना या चुका करणे टाळा

yogasana
Webdunia
मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (21:32 IST)
स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपण सगळं काही करतो. सकस आणि पौष्टीक आहार घेतो. व्यायाम करतो. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतो. योगासन देखील करतो. गेल्या काही वर्षांत लोकांना योगा बद्दलची  आवड वाढली असून काही लोक घरीच योगासन करतात. योगासन केल्याने शरीर निरोगी राहते. तुम्ही देखील योगासन घरी करत असाल तर योगासन करताना या चुका करणे टाळा. 
 
लगेच पाणी पिऊ नये-
योगा करत असाल तर या काळात पाणी पिण्याचे लक्षात ठेवा. योगासने करत असताना शरीरातील उष्णतेची पातळी हळूहळू वाढते. अशा परिस्थितीत जर कोणी थंड पाण्याचे सेवन केले तर उष्णतेची पातळी झपाट्याने खाली येऊ शकते. तसेच, यामुळे ऍलर्जी, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योगा केल्यानंतर 15 मिनिटांनीच पाणी प्या.
 
घाई करू नये- 
योग करताना घाई करू नये. योगसाठी एकाग्रता असणं आवश्यक आहे. योगसाठी पूर्ण वेळ द्या. असं केल्यानेच योगा केल्याचा फायदा मिळतो. 
 
योगासन ठराविक वेळेत करा- 
योगासने करण्याची वेळ आहे. योग दुपारी किंवा रात्री करू नये. वास्तविक, ब्रह्म मुहूर्त हा योगासने करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो कारण यावेळी झोपल्यानंतर शरीराला आराम मिळतो आणि दुसरे म्हणजे पोटही हलके असते. त्यामुळे वेळेची काळजी घेतली पाहिजे.
 
योग करणे सोडू नका-
अनेकांना असं वाटते की आज योगा केला तर त्याचे फायदे लगेच मिळावे. पण योगासनांचा प्रभाव हळू-हळू आणि दीर्घकाळा पर्यंत असतो. म्हणून योगासन करणे एकाएकी बंद करू नका. 

Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

Summer Special Recipe डाळींब शिकंजी सरबत

पाकिस्तानी PM चा आजार किती धोकादायक आहे? सुरुवातीची लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घ्या

अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

Akshaya Tritiya 2025 अक्षय तृतीया विशेष नैवेद्य थाळी

उन्हाळ्यात लिची खाण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments