Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मान आणि पाठीमध्ये नेहमी दुखत असेल तर करा हे योगासन

Neck and back pain always solution
Webdunia
बुधवार, 27 मार्च 2024 (21:30 IST)
चुकीची जीवनशैली तसेच ऑफिसमध्ये काम करत असतांना चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. तसेच अनेक लोक घरूनच काम करतात यामुळे पाठीचे आणि मानेचे दुखणे निर्माण होते. पण वेळेची जर या दुखण्यावर उपचार घेतले नाही तर दुखणे वाढू शकते तसेच अधिक गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. कंप्यूटर आणि लॅपटॉप वर काम करतांना डोळ्यांपेक्षा खांद्यांवर जास्त भार येतो. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे खांदे, मान, पाठ, कंबर यांवर पडणारा दबाव कमी करण्यासाठी तुम्ही योगासनचा अभ्यास करून आराम मिळवू शकतात. 
 
सेतुबंधासन 
डेस्क वर्क कारणाऱ्यांसाठी हे योगासन फायदेशीर असते. सेतुबंधासन करण्यासाठी पाठीच्या बाजूने झोपून दोन्ही गुडग्यांना वाकवून पायांनी फर्शीवर स्पर्श करा. आता हातांच्या मदतीने शरीर वरती उचला आणि पाठ आणि मांडयांना फर्शीवरून वरती उचला आणि दीर्घ श्वास घ्या आणि सोडा या अवस्थेत काही वेळ राहिल्यानंतर पूर्व स्थिति मध्ये यावे. 
 
ताडासन 
ताडासनचा अभ्यास करण्यासाठी आपले दोन्ही पायांच्या टाचा आणि ताळपायांमध्ये काही अंतर ठेऊन उभे रहा. आता हातांना कमरेवरून वरती नेऊन हात आणि बोटांना एकत्र मिळवा मान सरळ ठेऊन टाच वरती उचला आणि पूर्ण शरीराचे वजन तालताळपायांवर टाका. तसेच दरम्यान पोटाला मध्ये ठेवावे. या अवस्थेत काही वेळ संतुलन बनवून ठेवा मग परत पहिल्या अवस्थेत यावे. 
 
शोल्डर ओपनर 
या आसनमध्ये सरळ उभे राहून आपल्या स्नायूंना आराम दया. जेव्हा तळहातांना मागच्या बाजूने घेऊन जातांना एकमेकांना जोडा. जेवढे होईल तेवढे खांद्यांना मागे करावे. मग परत पहिल्या अवस्थामध्ये यावे . 

भुजंगासन 
या आसनमध्ये पोटाच्या बाजूने सरळ झोपा. मग आपल्या तळहातांना खांद्याच्या खाली ठेवा. आता बोटांना पसरवून छातीला वरती ओढा या अवस्थेमध्ये राहून श्वास घ्या. तसेच नंतर पूर्व अवस्थामध्ये यावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बसताना किंवा उभे राहताना तुमच्या पायांच्या हांड्यातून कट-कट आवाज येतो का , कारणे जाणून घ्या

योगासन करण्याचे 5 कारणे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : आचरण महत्वाचे की ज्ञान?

एप्रिल फूल बनवण्यासाठी आयडिया

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

पुढील लेख
Show comments