Festival Posters

कंबर दुखीपासून हे 4 योग आराम देतील

Webdunia
शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:32 IST)
बऱ्याच लोकांना कंबर दुखीचा त्रास होतो. थोडे देखील उठ बस करताना कंबरेत वेदना होते आजकाल तर तरुणांमध्ये देखील हा त्रास उद्भवत आहे. बरेच लोक चिकित्सकांना दाखवतात, औषध देखील घेतात पण वेदना कमी होत नाही. अशा लोकांनी एकदा तरी योग करून बघावे. योग केल्याने त्यांना कंबर दुखीच्या वेदनेपासून शक्य तितक्या आराम मिळेल. चला तर मग जाणून घ्या की कोणते योगा केल्याने कंबरेच्या वेदनेपासून आराम मिळतो.
 
1 चक्रासन 
चक्रासन केल्याने शरीराची मुद्रा चाका सारखी दिसू लागते. म्हणून हे नाव दिले आहे. कंबरेच्या दुखण्यात हे आसन फायदेशीर आहे पण हे हळू-हळू करावं. हे लक्षात ठेवा की कंबरेला ताण येऊ नये. या साठी सर्वप्रथम जमिनीवर झोपा, आता डोक्याच्या मागील बाजूस तळहाताला जमिनीवर ठेवून शरीराचे सर्व वजन हात आणि पायावर टाकून हळुवारपणे शरीराला वर उचलण्याचा प्रयत्न करा.
 
2 ताडासन 
कंबरदुखीपासून मुक्त होण्यासाठी ताडासन एक चांगले आसन असल्याचे सिद्ध आहे. लोक ह्या आसनाचा सराव म्हणून देखील करतात कारण हे करायला सहज आणि सोपं आहे. हे करण्यापूर्वी सर्वप्रथम सरळ उभे राहा. दोन्ही पायात खांद्याच्याप्रमाणे अंतर राखा. दोन्ही हात डोक्याच्या वर हाताचे बोटे एकमेकात फसवून जेवढे शक्य असेल श्वास धरून वरील बाजूस घेऊन खांद्यावरून ओढून खेचून घ्या आणि टाचा देखील उचला.
 
3 भुजंगासन 
कंबर दुखीला लवकरात लवकर दूर करण्यासाठी भुजंगासन करायला सुरू करा. हे करण्यासाठी आपण सर्वप्रथम सरळ जमिनीवर पाठीवर झोपा. नंतर हळूच हाताला छातीच्या समान अंतरावर ठेवा. नंतर कंबरेपासून नाभी पर्यंतच्या भागाला हळू-हळू श्वास भरून वर उचला. कंबरेमध्ये होणाऱ्या ताणला अनुभव करून हळू-हळू श्वास सोडत खाली या.
 
4 पर्वतासन
हे एक चांगले आणि सोपे आसन आहे. हे करण्यासाठी आपण जमिनीवर पोटावर झोपा. आता हातापायाच्या साहाय्याने शरीराला उचलण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने पर्वतासारखा आकार बनतो. प्रयत्न करा की गुडघे आणि कोपर वळवू नका. हे नियमाने 15 ते 20 सेकंद केल्याने चांगले परिणाम मिळतील.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुरुमे केवळ सुकामेव्यामुळेच नाही, तर हे पदार्थ खाऊन देखील येतात, जाणून घ्या

मदर्स डे निमित्त तुमच्या आईच्या फोटोसोबत ठेवण्यासाठी काही खास आणि मनाला भिडणारे मराठी कॅप्शन्स

Mother's Day 2026 wishes in Marathi मदर्स डे शुभेच्छा

Gift For Mom साडी म्हणजे मायेची ऊब; मदर्स डे निमित्त आईला एखादी सुंदर साडी भेट देणे हा सर्वात उत्तम पर्याय

खाण्यापूर्वी आंबे ३० मिनिटे पाण्यात भिजवा; जर तुम्ही अजून असे करत नसाल, तर आताच करा...

पुढील लेख
Show comments