Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yoga to reduce breast cancer risk :स्तन कॅन्सरचा धोका टाळतात ही योगासने, कोणती आहे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (22:02 IST)
Yoga to reduce breast cancer risk :ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जागरूकता महिना साजरा केला जातो. स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित जागरुकता आणि स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने हा जागरूकता महिना साजरा केला जातो. स्तनाचा कर्करोग शोधणे, जागरूकता, तपासणी आणि उपचारांद्वारे महिलांच्या आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

इतर प्रकारच्या कर्करोगाप्रमाणे, स्तनाचा कर्करोग देखील घातक आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, योगाच्या माध्यमातून कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरतात.ही काही योगासने आहेत जी कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. चला तर मग जाणून घेऊ या कोणती आहे ही योगासने.
 
बालासना-
बालासनाला लहान मुलांची(चाइल्ड पोज) मुद्रा असेही म्हणतात. या आसनामुळे छातीचे स्नायू, नितंब, मांड्या आणि पाठीला आराम मिळतो. बालासनाचा सराव स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मन शांत ठेवण्यासाठी तसेच थकवा आणि तणावापासून आराम मिळवण्यासाठी बालासनाचा सराव केला जाऊ शकतो. 
 
प्राणायाम-
संशोधकांच्या मते, ब्रेस्ट कॅन्सरच्या समस्येमध्ये प्राणायाम करण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. रेडिएशन थेरपी घेत असलेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या रूग्णांसाठी प्राणायाम सहायक थेरपी म्हणून उपयुक्त आहे. कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासोबतच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्राणायामचा सराव करता येतो.
 
 मत्स्यासन योग-
मत्स्यासन योगास हार्ट ओपनर योग म्हणतात, याचा अर्थ छाती, बरगड्या, फुफ्फुस आणि पाठीचा वरचा भाग उघडणे. हे स्तन आणि पेक्समध्ये लिम्फॅटिक ड्रेनेज उत्तेजित करून स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करते. योग तज्ज्ञांच्या मते, या योगाचा नियमित सराव केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते, जी कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. 
 






Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

तुमच्या केसांमध्ये सलूनसारखा ओलावा हवा आहे? या घरगुती उपायाचा अवलंब करा

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख