Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे इंटरनेटची स्पीड कमी झालाय? या 12 ट्रिक्स आजमावून पाहा

Webdunia
गुरूवार, 2 एप्रिल 2020 (20:44 IST)
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आज जवळपास निम्मं जग घरात दारं बंद करून बसलं आहे.
 
जगभरातले कोट्यवधी लोक घरी इंटरनेटवर काही ना काही स्ट्रीम करत आहेत किंवा घरून काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवरचा ताण वाढतोय.
 
एकट्या युकेमध्ये इंटरनेटच्या वापरात 20 टक्के वाढ झाल्याचं ओपनरीच या डिजिटल नेटवर्क कंपनीचं म्हणणं आहे. तर इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार भारतात ही वाढ सुमारे 10 टक्क्यांनीच झाली आहे.
 
त्यामुळे इंटरनेट स्पीड नेहमीपेक्षा कमीच आहे, असा सर्वांना संशय येणं साहजिकच आहे. आणि बहुदा ते खरंही आहे. कारण तशा तक्रारी येत आहेत.
 
कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करताना वेगवान इंटरनेट सेवा 'महत्त्वाची' असल्याचं युकेच्या सरकारनेही म्हटलं आहे. त्यामुळे ऑफकॉम या युकेमधल्या दूरसंचार नियामक संस्थेने काही सोपे उपाय सांगितले आहेत.
 
या उपाययोजना करून वाय-फायचा स्पीड वाढवता येऊ शकतो -
 
फरशी, भिंत, इतर उपकरणं अशा गोष्टी वाय-फायच्या सिग्नलमध्ये अडथळे ठरू शकतात. त्यामुळे राउटर मोकळ्या जागेवर टेबल किंवा शेल्फमध्ये ठेवा.
कॉर्डलेस फोन, हॅलोजन लाईट्स, लाईटचा प्रकाश कमी-जास्त करणारे डिमर स्विच, म्युझिक सिस्टिम किंवा कॉम्प्युटर स्पीकर्स, टिव्ही आणि मॉनिटर, अशी उपकरणं राउटरच्या सिग्नलमध्ये अडथळे आणतात. त्यामुळे शक्यतोवर त्यांच्यापासून राउटर दूरच ठेवा.
राउटर कायम सुरू ठेवा.
तुम्ही ऑफिसचा कॉल अटेंड करत असाल तर व्हिडिओ-ऑफ करून केवळ ऑडियो सुरू ठेवा, त्यामुळे कमी स्पीडमध्येही उत्तम क्वालिटीचं संभाषण होईल.
उत्तम ब्रॉडबँड स्पीडसाठी तुमचा काँप्युटर राउटरला जोडण्यासाठी वाय-फाय ऐवजी Ethernet केबल वापरा.
शक्य असेल तेव्हा टेलिफोन एक्सटेंशन कॉर्डचा वापर टाळा, कारण या कॉर्डच्या अडथळ्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो.
मायक्रोव्हेव अव्हनच्या वापरानेही वाय-फायचा स्पीड मंदावते. त्यामुळे व्हीडिओ कॉल करताना, HD व्हीडियो बघताना किंवा महत्त्वाचं ऑनलाईन काम करताना मायक्रोव्हेव ओव्हनचा वापर करणं टाळा.
तुम्हाला बघायचे असतील ते सिनेमे, व्हीडियो आधीच डाऊनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्ही सिनेमा बघत असताना इतर कुणी महत्त्वाचं काम करत असेल तर त्याची स्पीड कमी होऊ नये.
मोबाईल नेटवर्कच्या मागणीत वाढ झाल्याने शक्य असेल तिथे लँडलाईन फोनचा वापर करा.
कॉल करण्यासाठी वाय-फाय कॉलिंग सुविधेचा वापर करा. तसंच व्हॉट्सअॅप कॉल, फेसटाईम, स्काईपच्या माध्यमातून ऑडियो कॉल करता येऊ शकतो.
एखाद्या ठिकाणी किती युजर्स आहेत, त्यावरूनसुद्धा वाय-फायच्या स्पीडवर परिणाम होत असतो, त्यामुळे वापरात नसलेली उपकरणं डिसकनेक्ट करा.
बरेचदा टॅबलेट, स्मार्टफोनची स्क्रीन बंद केल्यावरही बॅकग्राउंडमध्ये अॅप्स सुरूच असतात. त्यामुळे काही महत्त्वाचं काम ऑनलाईन करत असाल तेव्हा या उपकरणांचा वाय-फाय सिग्नल ऑफ करा.
लॉकडाउनच्या काळात अनेक कंपन्यांनी इंटरनेटचा स्पीड कमी होऊन ग्राहकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवरचा ताण कमी व्हावा, यासाठी नेटफ्लिक्स, फेसबुक, युट्यूब यासारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनेही व्हीडियोची क्वालिटी कमी केली आहे, म्हणजे या प्लॅटफॉर्मवर HD ऐवजी SD पिक्चर क्वालिटी तुम्हाला मिळेल.
 
जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर लोक स्ट्रीमिंग करतात तेव्हा व्हीडियोची गुणवत्ता कमी करून स्पीड वाढवता येऊ शकतो.
 
दरम्यान, इंटरनेटच्या वाढलेल्या वापराचा ताण हाताळायला सक्षम असल्याचं इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं आहे.
 
लॉकडाऊनमुळे वाय-फाय इंटरनेटचा वापर वाढला असला तरी संध्याकाळच्या पीकटाईमपेक्षा तो अजूनही कमीच असल्याचं टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं आहे.
 
भारतात मात्र, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या बघता नेट स्लो होण्याची समस्या अनेकांना भेडसावते. तेव्हा वर दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments