Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रेटा थनबर्ग: हजारो लोकांचं नेतृत्व करणारी 16 वर्षांची मुलगी

Webdunia
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (11:36 IST)
हवामान बदलावर 16 वर्षांच्या ग्रेटा थनबर्गनं अमेरिकन संसदेने तयार केलेल्या समितीसमोर आपले विचार मांडले.
 
आपण वैज्ञानिकांचं ऐकायला हवं आणि त्यानुसार काम करायला हवं असं ती यावेळी म्हणाली. ग्रेटा थनबर्गच्या पाठीशी हजारो लोक आहेत. तिच्या कार्याला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे.
 
तिने स्वीडनमध्ये तापमान वाढीवर आंदोलन केलं. तिचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं.
 
त्यावेळी नार्वेतील खासदार फ्रेडी आंद्रे ओस्टेग्राड म्हणाले, "जर हवामान बदल रोखण्यासाठी आपण काहीच केलं नाही तर त्यातून युद्ध, संघर्ष आणि निर्वासितांच्या समस्या उभ्या राहणार आहेत. ग्रेटाने यासाठी लोकचळवळ उभी केली. शांततेसाठी तिचं हे योगदान आहे."
ग्रेटा कोण आहे?
ग्रेएटाने ट्वीटवर स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता असा करून दिला आहे. तिला अस्पर्जर सिंड्रोम हा आजार असल्याचंही तिनं म्हटलं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तिनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलनं केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही.
 
दावोस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तिने हवामान बदलावर तिची भूमिका मांडली आहे. हवामान बदलासमोर आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करावं लागेल, असं ती म्हणाली होती. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली आहे.
 
ग्रेएटाच्या आंदोलनाला Fridays For The Future असं नावं मिळालं असून हे आंदोलन विविध देशांत पोहोचलं आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये ही आंदोलनं झाली आहेत. शुक्रवारी जवळपास 100 देशांत हे आंदोलन झालं.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments