rashifal-2026

Resort Booking Tips रिसॉर्ट बुक करताना पैसे वाचवा, या चुका टाळा

Webdunia
मंगळवार, 25 जुलै 2023 (12:21 IST)
Resort Booking Tips जर तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल तर सुट्टीवर जाण्यापूर्वी रिसॉर्ट बुक करा. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे बजेटमध्ये रिसॉर्ट बुक करण्याविषयी सांगणार आहोत. रिसॉर्टच्या खोलीचे बिल कधीच ठरलेले नसते. अशात तुमचे एकूण बिल किती असेल? तुम्ही तिथे किती दिवस राहता यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एकाच रिसॉर्टमध्ये दीर्घकाळ राहिल्यास, तुम्हाला तेथे चांगली सूट मिळण्याची अपेक्षा करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही सुट्टीतही पैसे वाचवू शकता.
 
सर्वोत्तम ऑफर शोधा
योग्य डील मिळवण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम ऑफर शोधली पाहिजे. यासाठी तुम्ही अनेक वेबसाइट्सची मदत घेऊ शकता. जर तुमच्या मनात आधीपासून एखाद्या रिसॉर्टचे नाव असेल तर तुम्ही ते शोधू शकता आणि त्याचे दर शोधू शकता. एकाधिक वेबसाइट्समध्ये तुम्हाला सर्वात कमी रिसॉर्ट दर कोणत्या साइटवर दिसतात. त्या रिसॉर्टमध्ये तुम्ही रूम बुक करू शकता.
 
थेट संपर्क करा
साइटवर बघितल्यानंतर काही अडचण वाटत असेल किंवा पैसे जास्त मोजावे लागत आहे असे जाणवत असेल तर एकदा थेट त्या रिसॉर्टवर संपर्क करु शकता. ते देत असलेली डील अधिक योग्य असल्यास डायरेक्ट बुकिंग करु शकता.
 
डिस्काउंट
हे आवश्यक नाही की हॉटेलवाल्यांनीच तुम्हाला समोरून सवलत दिली पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही त्याच्याशी सवलतीबद्दल बोलू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही संपूर्ण कुटुंबासह सुट्टीचा विचार करत असाल तर तुम्ही संपूर्ण बिलावर काही टक्के ऑफर मागू शकता. याशिवाय तुम्ही रिसॉर्टच्या मॅनेजरकडूनही सूट मागू शकता.
 
एडवांस बुक करा
सहलीचे नियोजन करताना एडवांसमध्ये रिसॉर्ट बुक करावे. याच्या मदतीने तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. कारण रिसॉर्ट्स वगैरेच्या किमती ठरलेल्या नाहीत. ही किंमत कधीही वाढू किंवा कमी होऊ शकते. अशात त्याच दिवशी बुकिंग केल्यास तुम्हाला जास्त पैसे लागतील. त्यामुळे आगाऊ बुकिंग केल्यास तुमचे पैसेही वाचतात.
 
फोटो गॅलरी तपासा
बुकिंग करताना रिसॉर्टमधील सर्व सोयी-सुविधा फोटोच्या माध्यमाने बघा. फोटो नसतील तर संपर्क करुन मागवून घ्या. त्याने आपल्याला हव्या त्या सुविधा तेथे असल्याची खात्री करता येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धुरंधर' चित्रपटातील संजय दत्तचा पहिला लूक प्रदर्शित, या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर येणार

विवाहित चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडली समांथा रूथ प्रभू, नाते इंस्टाग्रामवर अधिकृत केले!

श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुला 23 वर्षांनंतर इंडियन आयडॉल मध्ये एकत्र गाणे गायले

सुपरस्टार रजनीकांत यांना IFFI 2025 मध्ये विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार

साखरपुड्यानंतर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न चर्चेत; कधी आणि कुठे करणार जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला हे पतीची पत्नी और पंगा सीझन 1 चे विजेते ठरले

Marathi Web Series : दमदार अभिनयाने सजलेल्या टॉप ५ 'Must Watch'

अभिनेत्री शर्लिन चोप्राने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले

दे दे प्यार दे 2' ने बॉक्स ऑफिसवर वेग पकडला, दुसऱ्या दिवशी इतकी कमाई केली

गलतेश्वर महादेव मंदिर सुरत

पुढील लेख
Show comments