Marathi Biodata Maker

मनपा निवडणुकीच्या युतीची चर्चा होणार असेल तर खुलेआम होईल-राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:43 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते. सकाळी राज ठाकरे हे विमानतळावर पोहचले तेव्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहचले आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. 
 
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या या अचानक झालेल्या भेटीवर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे काही पहिल्यांदा भेटलेले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना राज ठाकरे हे भेटले असतील तर त्यात काहीही वावगं नाही, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांचा मोठा पक्ष आहे. किमयागार नेता म्हणून त्यांची देशात असल्याचं कौतुकही प्रताप सरनाईकांनी राज ठाकरेंचं केलं आहे. 
 
दोन मोठे नेते भेटतात, तेव्हा चहापानाचा कार्यक्रम होतो. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून राज्याचे दोन नेते एकत्र आले. मनपा निवडणुकीच्या युतीची चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल, असं मला वाटतं नाही. तशी चर्चा होणार असेल तर खुलेआम होईल. हजारो लोकं अधिवेशनात येतात. कॅमेरे लागलेले आहेत. त्यामुळं ते खुलेआम भेटल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर येथील टेंभपुरी धरणात तीन मजुरांचा बुडून मृत्यू

मारेकऱ्याला फाशी दिल्याशिवाय कोणत्याही राजकारणीलाआमच्या घरी प्रवेश नाही, मुलीच्या पालकांची संतप्त प्रतिक्रिया

LIVE: छत्रपती संभाजीनगर येथील टेंभपुरी धरणात तीन मजुरांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्राला पहिली 1 कोटी 'लखपती दीदी' मिळणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

नसरापूर बलात्कार प्रकरणात संजय राऊतांची प्रतिक्रिया सरकार व्हीआयपी सुरक्षा आणि निवडणुकांमध्ये व्यस्त आहे म्हणाले

पुढील लेख
Show comments