Festival Posters

‘लालसिंग चड्ढा’ मधील करीनाचा लूक प्रदर्शित

Webdunia
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (09:51 IST)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘लालसिंग चड्ढा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर-खान स्क्रीन शेअर करत आहे. व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत करीनाचाही लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २०२० मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. 
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर करीनाचा फर्स्ट लूक शेअर करत ही माहिती दिली. प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये करीना पंजाबी मुलीच्या रुपात दिसत असून तिने आमिरला मिठी मारली आहे. परंतु यात आमिर पाठमोरा उभा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने करीना बऱ्याच वर्षांनंतर पंजाबी मुलीची भूमिका साकारत असल्याचं दिसून येत आहे.
 
 दरम्यान,१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

AA22xA6 Poster:अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; उद्या अभिनेत्याच्या वाढदिवशी चित्रपटाचे नाव जाहीर केले जाईल

विराट कोहली सुद्धा रणवीर सिंगचा चाहते बनले : 'धुरंधर २' ने सर्व विक्रम मोडले

तारक मेहता फेम दयाबेनच्या वडिलांचे निधन

जितेंद्र नेहमी पांढऱ्या रंगांच्या कपड्यात का दिसतात? 'जंपिंग जॅक'च्या आयुष्यातील रंजक किस्से

भारतातील ही नेत्रदीपक ठिकाणे युरोपलाही टक्कर देतात; जिथे ऋतू बदलताच संपूर्ण भूभाग फुलांनी बहरून जातो

पुढील लेख
Show comments