Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्थिक विवंचनेतून नितीन देसाईंची आत्महत्या – महेश बालदी

Webdunia
गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (07:42 IST)
Nitin Desais suicide due to financial hardship  कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज सकाळी स्टुडिओत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनं मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. एका संवेदनशील व्यक्तीने असं टोकाचं पाऊल का उचलल असेल याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असल्याचे स्थानिक आमदार महेश बालदी यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे.
 
यावेळी ते म्हणाले की, दीड महिन्यापूर्वी नितीन देसाई यांच्याशी माझी भेट झाली त्यावेळी त्यांनी आर्थिक विवंचनेत असल्याचे मला बोलले होते. आणि आज सकाळी चार वाजता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं.तिथले प्रमुख कार्यकर्ता सुधीर ठोंबरे यांनी मला सकाळी साडेआठ वाजता याची फोनवरुन माहिती दिली. आम्हाला त्यांचा मृतदेह कर्जत येथील स्टुडिओत लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. सेटवर असलेल्या एका कर्मचार्‍याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासात काय निष्कर्ष लागतो हे पाहावे लागेल असेही ते म्हणाले.
 
यावेळी बोलताना बालदी म्हणाले की, नितीन देसाई यांनी कर्जमधील स्थानिक मुलांना आपल्या स्टुडिओत काम दिलं होतं.एक दीड वर्षांपासून त्यांचा कुठला सिनेमा चांगला चाललेला नाही. ते काही टीव्ही सिरियल्सवरही काम करत होते.पण त्यातून त्यांची आर्थिक गाडी रुळावर येत नसल्याची स्थिती होती.त्यामुळं आजचा हा दुःखद दिवस आपल्याला पाहायला मिळाला.
 
रायगड किल्ला चांगला दिसला पाहिजे यासाठी ते खूपच प्रयत्नशील होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडला भेट दिली. तेव्हा त्यांनी नितीन देसाई यांनी चांगल सेट उभा केला होता. आणि सेटप्रमाणंचं रायगडचं सौंदर्य देखील उजळून निघावं अशी इच्छा असलेला हा कार्यकर्ता होता असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

जिओ स्टुडिओज् आणि वरुण नार्वेकर यांच्या “एक दोन तीन चार" चित्रपटाचं पहिलं गाणं “गुगली" आज झाले रिलीज !!!

भुशी डॅम: पावसाळ्यात ट्रेकिंगला, फिरायला जाताना 'ही' काळजी घ्या, वाचा महत्त्वाच्या टिप्स

देवोलिना भट्टाचार्जी ने प्रेग्नेंसीच्या बातमीवर तोडले मौन, म्हणाली

Kalki 2898 AD 2: कल्की 2898 AD' च्या सिक्वेलचे 60 टक्के शूटिंग पूर्ण

कर्नाटकमधली थंड हवेची ठिकाण

पुढील लेख
Show comments