Dharma Sangrah

सोनाक्षी सिन्हा 'ह्या' अभिनेत्याला करतेय डेट

Webdunia
बुधवार, 9 जानेवारी 2019 (16:27 IST)
मागील वर्ष बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वर्ष होते. आता 2019 वर्षात देखील बरीच लग्न व अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळू शकतात. सध्या बॉलिवूडमधील काही जोड्या आपल्या रोमँटिक लाईफबद्दल चर्चेत आहेत. खर्‍या आयुष्यात रोमांस  करणार्‍या कलाकारांच्या यादीत आता सोनाक्षी सिन्हाच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सध्या नवोदित अभिनेता जहीर इक्बालसोबत रोमांस करते आहे. जहीर सलमान खान फिल्म प्रोडक्शनच्या नोटबुकमधून यावर्षी 2019मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात मोनीष बहलची मुलगी प्रनूतन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी व जहीर सलमानमुळे एकमेकांना भेटले. अद्याप ते दोघे लोकांसोर एकत्र आलेले नाहीत. सोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण याचवर्षी फ्रेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले. खरे तर दोघांचेही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचणार असे मानले जात होते. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची खबर आली. बंटीनंतर सोनाच्या आयुष्यात जहीरने एन्ट्री घेतली आहे. या वर्षात नव्या जोड्यांमध्ये यांचा  देखील समावेश असेल असे बोलले जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

The beauty of Kerala दक्षिण भारतातील ही सुंदर ठिकाणे जिथे अनके चित्रपटांचे चित्रीकरण झाले

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

पुढील लेख
Show comments